श्रीपाद छिंदमचा सकल मराठा समाज श्रीरामपूरने केला निषेध

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर श्रीपाद छिंदमचा जाहीर निषेध करत त्यावर कडक कारवाई व्हावी या मागणीचे निवेदन सकल मराठा समाज, श्रीरामपूर शहर व तालुका तसेच शिवप्रेमी संघटनांनी पोलीस उपअधीक्षक वाकचौरे व शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक संपत शिंदे यांना दिले.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यावेळी मराठा समाजाच्या बांधवांनी तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त करत श्रीपाद छिंदमसारख्या अपप्रवृत्ती समाजात तेढ निर्माण करून लोकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करत असतात. अशा प्रवृतींना वेळीच ठेचण्यासाठी लोकशाही मार्गाने शांततेत आम्ही निवेदन देत असून पोलीस प्रशासनाने तात्काळ त्याच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून अशा नराधमांना पुन्हा गैरकृत्याची हिम्मत होणार नाही. 

यावेळी अवघ्या १५ ते २० मिनिटांमध्ये श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये तालुक्यातील अनेक मराठा बांधव यांनी धाव घेत शांतातेच्या मार्गाने निवेदन दिले. शहरातील नागरिक, व्यापारी बंधू-भगिनींना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मराठा समाजाने कुठलाही बंद न पाळता लोकशाही व पोलीस प्रशासनावर विश्वास ठेवत केलेल्या निषेधाचा आणखी एक आदर्श यानिमित्ताने बघायला मिळाल्याचे मत काही नागरिकांनी व्यक्त केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.