ब्लॉग - विकासाचे नेतृत्व हरपले

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर शहरासह तालुक्याचा विकास घडविण्यात जयंतराव ससाणे यांचा मोलाचा वाटा आहे.ससाणे यांच्या राजकीय कारकिर्द १९८५ पासून सुरु झाली.नगरसेवक म्हणून ते निवडून आल्यानंतर १९८७ ते १९९७ अशी दहा वर्षे त्यांनी श्रीरामपूर नगराध्यक्ष म्हणून कामकाज पाहिले.या दहा वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी श्रीरामपूर शहरात विकासाचा भागीरथ उभारला त्यामुळेच त्यांना १९९९च्या विधानसभा निवडणुकीत आमदार होण्याची संधी मिळाली त्यांनी आमदार भानुदास मुरकुटे यांचा पराभव करून हे यश मिळविले होते.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
त्यांचे हे यश राज्याला आश्चर्य चकित करणारे ठरले. २००४ साली साईबाबा संस्थानचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली यानंतर त्यांनी साईबाबा संस्थानचे अध्यक्ष म्हणून तब्बल नऊ वर्षे यशस्वी जबाबदारी संभाळली. याच कार्यकाळात २००४ साली श्रीरामपूर विधानसभेत ते दुसर्यांदा निवडून आले तसेच त्यांनी या पाच वर्षातही श्रीरामपूर शहरात अनेक विकास कामे केली.

हसतमुख चेहरा, उमदे व्यक्तीमत्व, संयमी स्वभाव व धूर्त व मुरब्बी बाणा, राजकीय परिपक्वता, प्रश्नांची जाण व प्रशासनाला हाताळण्याचे कौशल्यामुळे जयंतराव ससाणे लोकप्रिय नेते म्हणून नावालौकीला आले होत. त्यामुळेच त्यांचा कार्यकर्त्यांचा जथ्था वाढला होता. या सर्वांमुळेच त्यांना नगरपालिकेत त्यानंतर विधानसभेत यश मिळत गेले. मंत्रीपद तसेच साखर कारखाना व इतर संस्था नसतानाही त्यांनी श्रीरामपूरच्या विकासासाठी निधी आणला. निधी कसा आणायचा ही विलक्षण हातोटी त्यांच्याजवळ होती.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

श्रीरामपूर शहराचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न ससाणे यांनी उत्कृष्ट पणे सोडविला. येथील तलावाचा विस्तार त्यांनी वाढविला त्यामुळे श्रीरामपूरकरांना पिण्याच्या पाण्याची झळ कधी बसली नाही. जिल्ह्यात त्यांनी पहिल्यांदा श्रीरामपूरमध्ये भुयारी गटार योजना राबविली. श्रीरामपूरात यशस्वी ही योजना झाल्यानंतर ती जिल्हाभर राबविण्यात येत आहे. श्रीरामपूर शहरात काँक्रिट रस्ते त्यांनी करण्यावर भर दिला. आज श्रीरामपूर शहराचा जो विकास दिसत आहे. तो या विकासशील नेतृत्वामुळेच झालेला आहे. 

मुळा प्रवरा वीज सोसायटी, पिपल्स बँक आदी संस्थांवर त्यांनी संचालक म्हणून काम केले. या संस्थांमध्ये ही त्यांच्या विकासात्मक दृष्टीचा तेथील कर्मचायांबरोबरच सभासदांनाही लाभ झाला. जयंतराव ससाणे हे उत्कृष्ट संघटक होते. नियोजन कौशल्याचे ते धनी होते. त्यामुळे ते अनेक वर्षे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहिले. पक्षासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली.त्यांनी श्रीरामपुरात जी कामे केली ती कोणाला करता येतील की नाही, हे बोलणे चुकीचे आहे. परंतु त्यांनी जी कामे केली ती श्रीरामपूरकरांच्या चिरकाल स्मरणात राहणार आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

सर्व सामान्यांचा नेता म्हणून त्यांची ओळख होती. ती या पुढेही तशीच राहणा आहे. जयंतराव ससाणे यांच्या जाण्याने श्रीरामपूरच्या विकासाचा रथ रुतल्या सारखा झाला आहे. त्यांच्या निधनाने अनेकांनी श्रध्दांजली वाहिली. प्रत्येकाने श्रीरामपूरचे विकासाचे नेतृत्व हरपले, हीच प्रतिक्रिया नेत्यांपासून सर्वसामान्यांच्या मुखातून निघत होती ससाणे यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालीय ती कधीच भरून न येणारी आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.