नेता असावा तर रामभाऊ सारखा...!

ओंकार दळवी,जामखेड - आजचे नेते सामान्य माणसांच्या प्रश्नांला फारसे महत्व देत नाहीत. एखादा गरीब माणूस जर स्वतःची समस्या घेऊन नेत्याकडे गेला तर नेता बोलायच्या अगोदर नेत्याच्या भोवती बसलेले त्याचे अनुयायीच त्या माणसावर खेकसतात, म्हणतात ''हे काम सायेबांना सांगतोयस ? काय किमंत घालवतोय काय आमच्या सायेबांची” हे अनेकांनी अनुभवलेलं असतं. त्यांच्या अनुयायांना किरकोळ वाटणार काम त्या माणसासाठी खूप महत्त्वाचं असतं. अनेक अडचणींना सामना करूनही राम भाऊनी अनेकांचे जिव्हाळ्याचे विषय मार्गी लावले काहींचे वैयक्तिक कामेही एका फोन वर ते करतात.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
विशेष म्हणजे रामभाऊंनी ही गोष्ट जाहीर सभेत कधी सांगितली नाही. प्रचारात सांगितली नाही ,या घटनेची जाहिरात केली नाही. कारण अशा कित्येक गोष्टी होत्या सागण्या सारख्या.कोणत्या गोष्टी सांगायच्या ? आजचे नेते असे वागत नाहीत आणि चुकून कोणी वागले तर त्याची बातमी होते. रामभाऊंच्या आयुष्यात बातमी बनण्यासारख्या शेकडो गोष्टी घडल्या. पण त्याच्या बातम्या झाल्या नाहीत. 

पण त्या मतदारसंघासह महाराष्ट्रातील जनतेने आठवणी लोकांनी अंतःकरणात जपून ठेवल्या आहेत सरपंच ते थेट मंत्री असा अविस्मरणीय प्रवास कर्जत -जामखेड मतदार संघाचे भाग्यविधाते नामदार राम शिंदे साहेब करत आहे आपल्या वेगळ्या शैलीतून महाराष्ट्रात वेगळा ठसा उमठवणारे राम (भाऊ ) शिंदेच होते. प्रा राम शिंदे यांचा कार्यकाळ इ.स. २००९ पासून आता (सलग ३ टर्म ) कर्जत जामखेड प्रतिनिधित्व करत आहे.

पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचे वडील माणकोजी शिंदे व आई सुशिलाबाई शिंदे यांच्या घराण्यातील नववा वंशज म्हणून प्रा. राम शिंदे संपुर्ण महाराष्ट्रात परिचित आहेत.जामखेड तालुक्यातील चौंडी येथील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबियात शेतकरी व दुसऱ्याच्या घरी साल घालून व अतीशय गरीबी आसणाऱ्या शंकर शिंदे यांच्या घरात जन्मलेल्या ना प्रा राम शिंदेना लहानपणापासून वडील शंकर शिंदे, आई भामाबाई शिंदे यांनी मोल मंजुरी करून यांनी त्याचे शिक्षण केले व यांच्याकडून चांगल्या सस्कारांचे बाळकडू मिळाले एम.एस्सी. (प्रथम श्रेणी), बी. एड्.शिक्षण झालेले मास्तर असलेले प्रा. राम शिंदे यांचा जन्म 1 जानेवारी 1969 साली झाला. अभ्यासपूर्ण, सुसूत्रपणे, मुद्देसूदपणे, बोलून, वाक्चातुर्याने गाजविणारे धडाडीचे नेतृत्व म्हणजेच प्रा. राम शिंदे . जामखेड च्या राजकीय पटलावर त्यांची वेगळी ओळख आहे. 

सर्वसामान्यांची वेदना जाणून घेऊन विविध प्रश्नांवर आक्रमक होऊन त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणे, हा त्यांचा अंगीभूत गुण आहे. फर्डे वक्ते निर्भीडता हि त्यांच्या अंगी आहे. शांत, संयमी, निर्गवी असे हे व्यक्तिमत्व आहे. ते जेवढे भाऊक आहेत तितकेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर आक्रमक आहेत.समाज प्रश्नांची जाण आणि भानहि त्यांच्या ठायी आहे. माणसाने आपल्या तत्वांशी कधीही तडजोड करू नये, सत्याचा पाठपुरावा करावा हे तत्व त्यांनी आजवर ठेवल्याने लोकप्रियता मिळवली आहे. प्रा. राम शिंदे यांनी समाजकारण, राजकारण, शिक्षण, सहकार, उद्योग व्यवसाय क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे; वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांची राजकारणातील गरुड भरारी सर्वांसाठी प्रेरणादायी अशीच आहे.

आमदार असताना कर्जत, श्रीगोंदा, सह सोलापुर जिल्ह्यातील माळढोक पक्षी आरक्षण संदर्भात मोठया प्रमाणावर आंदोलन करुन माळढोक पक्षी आरक्षण उठविले व शेतक-यांना दिलासा देऊन कर्ज प्रकरण व खरेदी विक्री व्यवहारास परवानगी मिळवुन दिली. त्यानंतर त्यांना थेट गृहराज्यमंत्री केले राज्यात झालेल्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रभावी कार्य केले. कुकडी प्रकल्पाचे पाणी दुष्काळग्रस्त कर्जत, करमाळा, श्रीगोंदा,या भागात नेण्यासाठी अविरत प्रयत्न केले. कर्जत शहराच्या पाणीपुरवठयासाठी नविन पाईपलाईन मंजुर केली. जामखेड तालुक्यातील हळग़ाव येथे कृषि महाविदयालय मंजुर केले.गेल्या ७० वर्षापासून हा मतदारसंघ मंत्री पदापासून वंचित होता परंतु ना प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या आशिर्वादाने ते मिळाले आहे.व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू म्हणून मंञी मंडळात स्थान आहे.

बाहेरगावी पदवी पूर्ण करून आपल्या वडिलांकडे असलेली तुटपुंजी शेती आणि कुटुबियांचा उदरनिर्वाह या सर्व बाबींचा विचार करून त्यानी बीड जिल्ह्य़ातील आष्टी येथे प्रा म्हणून शिक्षकी पेशा स्वीकारला. खरे तर त्यांच्या आई वडीलाचे स्वप्न पोलिस निरीक्षक होण्याचे स्वप्न होते परंतू ते स्वप्नच राहिले. ना. शिंदे यांना आपल्या पूर्वजांनी घालून दिलेल्या सामाजिक कार्याचा वसा व आपल्या कुटुंबियांना मिळालेला पूर्वजांचा मोठा वारसा याबाबत अभिमान होता. ना.प्रा राम शिंदे प्राध्यापक होऊन देखील समाधानी नव्हते. त्यांना सामाजिक कार्याची ओढ जाणवत होती. चौंडी या आपल्या पूर्वजांच्या एैतिहासीक गावामध्ये काहीतरी करून दाखविण्याचा मनसुंबा ठेवून ना. शिंदे यांनी गावच्या राजकारणात उतरण्याचा निश्चित केला. 

गावाच्या राजकारणातून घेतलेली उडी त्यांना गावच्या सरपंचपदापर्यंत घेवून गेली. सरपंच झाल्यावर गावच्या विकास कामाकरिता त्यांनी अतोनात प्रयत्न केले. गावचा खुंटलेला विकास करण्यासाठी त्यांनी गावात विकास कामाची मुहूर्तमेढ रोवली. हुशार, बुद्धीजीवी, चाणक्य, अभ्यासू व्यक्तीमत्व असलेल्या ना. प्रा राम शिंदे यांना त्यावेळीची तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या माध्यमातून गावच्या विकासासाठी भरीव निधी मिळवून गावात विकासाची गंगा आणली. चौंडी गावचे राजकारण करत असताना या सीना काठच्या गावात थोड्या कालावधीत अनेक विकास कामे मार्गी लावली. विकास कामाच्या माध्यमातून तालुक्याच्या राजकारणात त्यांनी सौभाग्यवतींचा प्रवेश केला. 

जामखेड तालुक्यातील जवळा पं. स. गटातून त्यांच्या सौभाग्यवती सभापती बनल्या. ही मिळालेली राजकीय संधी त्यांना खऱ्या अर्थाने तालुक्याच्या राजकारणात काम करण्याची संधीचे सोने मिळून देणारा ठरली. पंचायत समितीमध्ये सभापती पदातून केलेली विकासकामे त्यांनी कर्जत जामखेडमधून आमदारकी लढविण्यासाठी एक चांगली संधी प्राप्त करून देणारी ठरली. आमदारकीसाठी भाजपकडून व लोक नेते स्व गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या मुळे मिळालेले तिकीट आणि कर्जत, जामखेडच्या जनतेने या तडफदार तरुणावर दाखविलेले प्रेम त्यांना विजय मिळवून देण्यास कारणीभूत ठरला. आमदारकीची अचानक मिळालेल्या संधीचे ना. शिंदे यांनी सोने केले सर्व सामान्य माणसाच्या प्रश्नानासाठी सतत लढा देणारे व गोरगरीब शेतकर्‍यांच्या प्रश्नानाची जाण आसणारा नेता म्हणून त्याच्या कडे बघून जनतेने पुन्हा ४० हजार मतांनी निवडून दिले आहे.

सर्वसामान्यांच्या गळ्यातील ताईत बनलेल्या ना. शिंदे यांनी विकास कामाच्या माध्यमातून चौंडीगावचे सरपंच ते थेट राज्याचे जलसंधारण कॅबिनेट मंत्री व जिल्हाचे पालक मंत्री असा राजकीय प्रवास अहोरात्र विकास कामे करून सुरुच ठेवला. चौंडी गावापासून सुरुवात केलेल्या विकास कामाची बांधलेली मोट त्यांनी आपल्या मतदार संघातही विकास कामातून दाखवून दिली. गेल्या अनेक वर्षाचा विकासाचा अवशेष त्यांनी भरून काढत आहेत अनेक अडचणींना सामना करूनही राम भाऊनी अनेकांचे जिव्हाळ्याचे विषय मार्गी लावले 

ना. शिंदेंनी मतदार संघातील प्रत्येक वाड्या-वस्त्यांवर, गावागावांमध्ये विकासकामे करण्याचा सपाटा लावला. जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न, कुकडीचे पाणी, माळढोक आरक्षण, सीना धरणातील पाणीबाबत तसेच धरणातील उंची वाढविण्यासाठी व हाळगाव येथे पुण्यश्लोक राज माता अहिल्याबाई होळकर कृषी महाविद्यालयाची स्थापना. त्यांनी अनेकदा आंदोलने केली. मतदारसंघातील एक ना एक गावाशी संपर्क ठेवून प्रत्येक कार्यकत्र्याला राजकीय पाठबळ देण्याचे कामे केले. अनेक गावात विकासाचे कामे करताना केव्हाही कार्यकत्र्यांनी संपर्क केला असता हॅलो म्हटले की आलो म्हणत त्यांनी अनेक कामे मार्गी लावली.

कोणालाही नुसते आश्वासने न देता कामे प्रत्यक्षात मार्गी लावण्याची त्यांच्या कामाच्या पद्धतीने अनेकांची मने जिंकली. तुकाई चारी प्रश्नी त्यांनी वेळोवेळी संबंधीत विभागाच्या वरिष्ठांकडे अनेकदा पाठपुरावा करून चर्चा घडवून आणली. विकास कामाच्या जोरावर पुन्हा पक्षाने विधानसभेत दुसऱ्यांदा या जनतेच्या लाडक्या नेतृत्वाला आमदार होण्याची संधी दिली. मोठ्या मताधिक्याने विजयी होऊन गावचे सरपंच ते राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री व तर राज्याचे गृहराज्यमंत्री ,असे विविध सात खात्याचे राज्यमंत्री होण्याचा त्यांनी बहुमान मिळविला. 

स्वर्गीय माजी मंत्री आबासाहेब निंबाळकरानंतर या भागाला चांगले नेतृत्व लाभले. तब्बल ७० वर्षानंतर या भागाला न्यायाची वागणूक देणारा नेता ना. शिंदे यांच्या माध्यमातून मिळाला. विकासाची कामे होत असताना कायम दुष्काळी असलेल्या या भागाचा खरा वणवास आता संपल्याने जनतेला जणू काही रामच मिळाला असल्याचे भासू लागले. या भागाला चांगली नेतृत्व लाभल्याने येथील ग्रामीण भागातील अनेक शैक्षणिक संस्थांना तसेच शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी त्यांनी भरीव मदत केली. आजही राज्यभर आपल्या कार्यातून विकास कामाची व जलसंधारण कामाची चुनक दाखवत राज्यभर फिरत असताना ना. शिंदे मतदार संघातील जनतेबरोबर पूर्वीप्रमाणेच प्रेमाने बोलताना दिसतात. 

मतदार संघातील कुकडीचे पाणी तसेच माळढोक प्रश्न सोडवण्यात त्यांना यशही प्राप्त झाले. शेतकऱ्यांवर अन्यायकारक असलेल्या माळढोक आरक्षण प्रश्नासाठी त्यांनी शासकीय पातळीवर आतोनात प्रयत्नाची पराकष्टा केली. आजही आपल्या विकास कामाच्या माध्यमातून ते राज्यभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य करीत आहेत. ना. शिंदे यांनी आयुष्यातील खडतर प्रवासाने त्यांनी आपले व आपल्या गावाचे व जिल्हाचे व मतदाराचे नावलौकीक केले. आपल्या राजकीय कारकीर्दीत सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू मानून ना. शिंदे यांनी प्रत्येक वेळी चांगला न्याय देण्याचे काम केले आहे. 

विकासाची कामे होत असताना कायम दुष्काळी असलेल्या या भागाचा खरा वणवास आता संपल्याने जनतेला जणू काही रामच मिळाला असल्याचे भासू लागले. या भागाला चांगली नेतृत्व लाभल्याने येथील ग्रामीण भागातील अनेक शैक्षणिक संस्थांना तसेच शेतकऱ्यांना शेती व्यवसायासाठी त्यांनी भरीव मदत केली. आजही राज्यभर आपल्या कार्यातून विकास कामाची चुनक दाखवत राज्यभर फिरत असताना ना. शिंदे मतदार संघातील जनतेबरोबर पूर्वीप्रमाणेच प्रेमाने बोलताना दिसतात. मतदार संघातील कुकडीचे पाणी तसेच माळढोक प्रश्न सोडवण्यात त्यांना यशही प्राप्त झाले. शेतकऱ्यांवर अन्यायकारक असलेल्या माळढोक आरक्षण प्रश्नासाठी त्यांनी शासकीय पातळीवर आतोनात प्रयत्नाची पराकष्टा केली. 

आजही आपल्या विकास कामाच्या माध्यमातून ते राज्यभरातील चाहत्यांच्या मनावर राज्य करीत आहेत. ना. शिंदे यांनी आयुष्यातील खडतर प्रवासाने त्यांनी आपले व आपल्या गावाचे नावलौकीक केले. आपल्या राजकीय कारकीर्दीत सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू मानून ना. शिंदे यांनी प्रत्येक वेळी चांगला न्याय देण्याचे काम केले आहे.

जलयुक्त शिवार अभियानातर्गत झालेल्या नदी खोलीकरण व रुंदीकरण व सिमेंट बंधारे रोजगार हमी योजनेंतर्गत शेततळे कंपार्टमेंट बंडिग आशा विविध कामाचे महत्वाचे कामे पूर्ण झाली आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हा सुखी झाले आहेत. आशा विकासाचे माहामेरू म्हणून ओळखले जाणारे ना प्रा राम शिंदे या लाडक्या सीनापुत्रास त्यांच्या ४८ व्या वाढदिवसाच्या निमित्त कोटी कोटी शुभेच्छा..!

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.