प्रिटं मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीयाची ग्रामिण भागाला सावत्र वागणूक

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :मागील पाच वर्षात माहिती व तत्रंज्ञानाच्या युगात मोठी क्रांती झाली असल्यामुळे जग हे जवळ आले आहे. मात्रं या तत्रंज्ञानाच्या क्रांतीचा तरुण वर्गावर चागला व वाईट अशा दोन्ही प्रकारचा परिणाम झाल्याचे समोर येत आहे. तर पत्रकारीता क्षेत्रात काम करत असताना प्रिटं मिडीया व इलेक्ट्रॉनिक मिडीया कडून ग्रामिण भागातील शेतक-याच्या प्रश्न मांडणीला आवघी २ टक्के जागा मिळत असून प्रिटं मिडीयाचे वाचण आठवड्याला केवळ साठ मिनिट असल्याने दैनिक लोकसंत्ताचे वरिष्ठ पत्रकार अशोक तुपे यांनी याबाबद् चितां व्यक्तं केली तर सोशल मिडीयाच्या वापरा बाबद् सजग राहण्याचा सल्ला तरुणाईला दिला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथिल कला, वाणिज्य, विज्ञान व संगणकशास्त्र महाविद्यालयात पत्रकारदिना निमित्तं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्वी प्रेस क्लबंचे अध्यक्ष सिताराम चांडे होते. तर व्यासपीठावर दैनिक पुण्यनगरीचे वृत्तं सपांदक विकास अंत्रे, माजी जिल्हा परिषद सदंस्य अण्णासाहेब भोसले, प्राचार्य डॉ. रामा पवार, पत्रकार संजय गायकवाड, सुरेश थोरात, शरद ढमक, रवी बालोटे, अनिल शेळके, भगवान लांडे, भाऊसाहेब ताजणे, राजेद्रं थेटे, सुनिल तुरकने, सोमनाथ डोळे, राहुल गाडेकर आदि उपस्थित होते.

अशोक तुपे पुढे म्हणाले की, प्रसारमाध्यमानी शेतक-याच्या प्रश्न व योजनाच्या आमंलबजावणी बाबद् सरकारला धारेवर धरत शेतक-याना न्याय मिळवून देण्यासाठी प्राधान्य द्यावे. सुशिक्षित तरुणानी सोशलमिडीयावर येणा-या पोस्टचा सदविवेक बुद्धीने सामना करत सोशलमिडीयाचा वापर समाजहितासाठी करावा असे अवाहन याप्रसंगी तरुणाईला केले आहे.

दैनिक पुण्यनगरीचे वृत्तं सपांदक विकास अंत्रे म्हणाले की, सरकारने कर्जमाफीसाठी अॉनलाईनची अट घातल्याने आश्वी खुर्द येथिल प्रवरा महाविद्यालयाने पुढे येऊन शेतक-याप्रती कृतज्ञता व्यक्तं करत मोफत कर्ज माफीचे अर्ज भरल्याने महाविद्यालयाचे कौतक केले. तर समाज माध्यमे हि पूर्णपणे व्यावसायिक होत असल्याने ग्रामिण भागातील समस्यां बाबदची उदासिनता देशाला परवडणारी नाही.

आजच्या तरुणानी सामाजिक बांधिलकी ठेवत सोशल मिडीयांचा वापर शेतक-याचे प्रश्नं प्रभावीपणे मांडत त्याची सोडवणूक करावी असे आवाहण त्यानी केले आहे. तर व्यावसायिकतेकडे वळालेल्या प्रसारमाध्यमाध्यमाची ग्रामिण भागाबाबद् नकारात्मकता ही समाजासाठी घातक आहे. त्यामुळे पत्रकारानी व्यावहारीक दृष्टीकोना ऐवजी सत्याचा पाठपूरावा करावा. भविष्यातील सोशलमिडीयाचा वाढता प्रभाव पाहता तरुणाची कार्यशाळा घेण्याचा मानसही त्यानी व्यंक्त केला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. ए. पवार म्हणाले की, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामिण भागाला शैक्षणिक, अर्थिक व सामाजिक स्थैर्य मिळावे यासाठी प्रवरा ग्रामिण शिक्षण संस्थेची स्थापना केली. तर ग्रामिण भागातील तरुण मुख्य प्रवाहात यावा यासाठी पद्मभुषण बाळासाहेब विखे पाटील यानी प्रवरेत शिक्षणाच्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देत शेतक-याच्या मुला-मुलीना शिक्षणाच्या संधी निर्माण केल्यामुळे प्रवरेचा विद्यार्थी आज सर्वच बाबतीत आघाडीवर असल्याचे सांगितले. यावेळी त्यानी महाविद्यालय राबवत असलेल्या उपक्रमाची माहिती देत पत्रकाराच्या कामाचे कौतुक केले आहे.

दरम्यान यावेळी महाविद्यालयाच्या वतीने आश्वी परिसरातील सर्व पत्रकांराचा सत्कांर केला आहे. तर अहमदनगर प्रेस कल्बंचा पुरस्कांर मिळाल्याबद्दल विकास अंत्रे यांचे विशेष कौतुव व सत्कांर करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामा पवार यांनी केले. अतिथिचा परिचय डॉ. ए. आर. घोलप यानी करुन दिला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. एस. आर. पाचोरे व प्रा. ए. आर. दिघे यांनी केले. तर आभार उपप्राचार्य देविदास दाभाडे यानी मानले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.