राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.विधाते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते अरुणोदय गो शाळेस चारा वाटप करण्यात आले. यावेळी प्रा.विधाते, संजय झिंजे, कुमारसिंह वाकळे, अभिजीत खोसे, अमित खामकर, साहेबान जहागीरदार, गजेंद्र भांडवलकर, वैभव ढाकणे, गहिनीनाथ (दादा) दरेकर, प्रकाश भागानगरे, अरुण खिची आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
आ.संग्राम जगताप म्हणाले की, अनेक विद्यार्थी प्रा.विधाते यांनी घडविले असून, अशा गुरुंचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला आहे. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व देवून, त्यांची पक्षामध्ये वाटचाल सुरु आहे. युवा कार्यकर्ते पासून तर सुज्ञ व बुध्दीजीवी वर्ग प्रा.विधाते यांनी पक्षाशी जोडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

प्रा.माणिक विधाते यांनी शहरात गो सेवेसाठी सुरु करण्यात आलेली अरुणोदय गो शाळा उत्तम रित्या चालविली जात असून, याला मदत करण्याचे आवाहन केले. तसेच विविध सामाजिक उपक्रम आ.अरुणकाका जगताप यांच्या प्रेरणेने राबविले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.