चौकशी समितीला ठेकेदार सचिन लोटकेचा ठेंगा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-पथदिवे घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीसमोर येऊन स्वतःची बाजू मांडण्याची तसदी संबंधित कामांचा ठेकेदार सचिन लोटके याने घेतलीच नाही. चौकशी समितीने सकाळी ११ वाजता त्याला बोलावले होते, पण तासभर वाट पाहूनही तो न आल्याने चौकशी समितीने त्यासंदर्भातील स्वतःचे अंतिम मत नोंदवण्याचे काम सुरू केले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
दरम्यान, समितीचे काम अंतिम टप्प्यात असून, अंतिम अहवाल तयार करण्याचे काम सुरू झाले असल्याने हा अहवाल मंगळवारी (९ जानेवारी) अंतिम होऊन आयुक्त घनश्याम मंगळे यांच्याकडे सादर होणार आहे.

पथदिव्यांची बोगस बिले करून ४० लाख रुपये लाटल्याप्रकरणाच्या चौकशीसाठी अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे व नगर रचना विभागाचे सहायक संचालक संतोष धोंगडे यांची द्विसदस्यीस समिती नेमण्यात आली आहे. या समितीने विद्युत, बांधकाम, लेखा परीक्षण व लेखा अशा चारही विभाग प्रमुखांसह प्रभाग समिती १ व २८ चे प्रभाग अधिकारी तसेच या दोनही वॉर्डांचे संबंधित नगरसेवकांचे म्हणणे जाणून घेतले आहे. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------

या पथदिवे उभारणीच्या प्रकरणाशी संबंधित सचिन लोटके नावाच्या ठेकेदारालाही त्याचे म्हणणे मांडण्याचे सांगण्यात आले होते. सोमवारी (८ जानेवारी) सकाळी ११ ची वेळ त्याला देण्यात आली होती; मात्र, दुपारी १२ वाजेपर्यंत तो आलाच नाही. त्यामुळे त्याला याबाबत काही म्हणणे सादर करायचे नसावे, हे समजून समितीने अंतिम अहवालाच्यादृष्टीने कार्यवाही सुरू केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.