शिवसेनेचे नगरसेवक हे विकासाच्याच दृष्टीने काम करतात - महापौर कदम.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :प्रत्यक्ष जनतेच्या संपर्कात राहणारा जनसेवक म्हणजेच नगरसेवक. शहराच्या विकासात हा महत्वाचा घटक आहे. प्रभागातील प्रत्येक बारीक-सारिक गोष्टींचा अभ्यास हा नगरसेवकाचा असतो. प्रत्येक समस्या आणि विकास कामांचा ताळेबंद तयार करुन आपल्या प्रभागाच्या विकासात नगरसेवक महत्वाची भूमिका बजावतात. शहरातील प्रत्येक भागात असा विकास झाला तर शहराचाही विकास होत असतो. शिवसेनेचे नगरसेवक हे विकासाच्याच दृष्टीने काम करत आहेत. प्रभागाच्या विकासाबरोबरच शहराच्या विकासात भर घालण्याचेच काम होत असल्याचे महापौर सुरेखा कदम यांनी केले.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
बागरोजा हडको (प्रभाग २५) येथे रस्ता डांबरीकरण कामाचा प्रारंभ महापौर सुरेखा कदम यांच्या हस्ते झाला. नगरसेवक संजय शेंडगे, संभाजी कदम, सुरेश तिवारी, सचिन शिंदे, सुनील गायकवाड, केतन गुंदेचा, रमेश कुमार, सुरेश सुंकी, गणेश मुलिया, दिनेश येवले, बाळासाहेब सोनवणे, बाळासाहेब मोरे, हनुमंत चारी, जितेंद्र शिरसाठ, अस्लम शेख, अप्पा नळकांडे, व्यंकटेश कोडम, रामदास साळूंके आदी उपस्थित होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नगरसेवक संजय शेंडगे हे प्रभागात चांगले काम करत असल्याचे महापौर कदम यांनी सांगितले. नगरसेवक संजय शेंडगे यांनी प्रभागात नियोजनपूर्ण काम सुरू असून, प्रमुख मूलभूत समस्यां मार्गी लावण्यावर भर असल्याचे सांगितले. संभाजी कदम, उपमुख्याध्यापक सुनील गायकवाड यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.