वाहनांच्या धडकेत कोतवाल जागीच ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :संगमनेर तालुक्यातील निमोण शिवारातील पारेगाव फाट्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने पारेगाव गडाखचे कोतवाल राजेंद्र बाबापाटील गडाख (वय ३८) जागीच ठार झाले, तर एकजण जबर जखमी झाला. रविवारी लोणी- नांदूरशिंगोटे रस्त्यावर सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास निमोण शिवारात ही घटना घडली.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पारेगाव गडाख येथील कोतवाल राजेंद्र बाबापाटील गडाख व बाबासाहेब गोपाळा गडाख हे दोघे दुचाकीवरून (क्र. एमएच १७ बीएच २२२५ ) घराकडे परतीचा प्रवास करीत होते. यादरम्यान त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली. यात जबर मार लागल्याने कोतवाल राजेंद्र गडाख जागीच ठार झाले. तर बाबासाहेब गडाख यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना संगमनेर येथील डॉ. तांबे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविला. अपघातास कारणीभूत अज्ञात चालक वाहन घेवून पसार झाला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनला अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस नाईक किशोर पालवे यांनी सांगितले. मयत राजेंद्र गडाख यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.