वृद्ध महिलेला घरात घुसून दोघांची शिवीगाळ.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वृद्ध महिलेला घरात घुसून दोघांनी शिवीगाळ करण्याचा प्रकार नवीन कापड बाजारातील अर्बन बॅंक रोडवरील जुन्या वाड्यात झाला आहे. या दोघांपैकी एकाने घराचा दरवाजा तोडत दहशत निर्माण केली. त्यामुळे ही वृद्ध महिला घाबरली आहे. माधवी साबळे (वय ६२) यांच्या फिर्यादीवरून प्रमोद गांधी व त्याचा मुलगा याच्याविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. रविवारी (ता. ७) दुपारी एक वाजल्याचा सुमारास हा प्रकार झाला. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
माधवी साबळे हे त्यांचा मुलगा मंदार याच्यासह नगर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या नवीन कापड बाजारातील अर्बन बॅंक रोडवरील जुन्या वाड्यात राहतात. मुलगा मंदार हा सध्या कामानिमित्त पुणे येथे आहे. घर जुना वाडा असून, ते दीर श्रीनिवास गोसावी-साबळे यांच्या नावावर आहे. वाड्याच्या रोडलगतचा काही भाग हा त्यांनी सारसनगर येथील प्रमोद गांधी यांना विकल्याचे समजते. परंतु याबाबत कोणीही कधी विचारणा केली नाही. रविवारी घरात दुपारी एकटीच काम करत होते. त्यावेळी प्रमोद गांधी व त्याचा मुलगा हा शिवीगाळ करत घरात घुसले. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत अंगावर धावून आले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
'ही जागा विकत घेतली आहे. जागेवर मला ताबा हवा आहे. मी वाड्याची भिंत पाडून टाकणार असे म्हणत शिवीगाळ केली. माझ्या नादी लागल्यास सोडणार नाही. मी त्यांना व तुला जिवंत सोडणार नाही,' अशी धमकी दिली. वाड्यातून जाताना प्रमोद गांधी याच्याबरोबर असलेल्या मुलाने दरवाजा तोडून टाकल्याचे माधवी साबळे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. माधवी साबळे यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, पोलीस कर्मचारी राजेंद्र मुळे तपास करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.