श्रीगोंदा पोलिसांच्या तत्परतेमुळे फसला तरुणाच्या अपहरणाचा डाव.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :रात्रीची आठ ते साडे आठची वेळ, शहरातील भररस्त्यावरील रहदारी चालू.आणि अशातच स्कॉर्पिओतून आलेले दोन इसम शहरातील मित्रांसोबत देवदर्शन घेऊन घरी परतणाऱ्या तरुणाला अडवून मारहाण करतात. त्याचे अपहरण करून सर्वांसमोर त्याला घेऊन जातात. श्रीगोंदा पोलिसांना याबाबत माहिती कळते आणि पोलीस दुचाकीवरून जात आरोपींना पकडतात. एखाद्या सिनेमाच्या कथानकाला शोभेल असा हा चित्तथरारक प्रकार (दि.६) रोजी रात्री श्रीगोंदा शहरात घडला. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहरातील गवळीगल्ली येथील रेणुकामाता मंदिरात राहणारे विनायक प्रकाश भुते (वय २८) हे काल (दि.६ ) रोजी रात्री आठ वाजता शहरातील शनिमंदिरातून दर्शन घेऊन त्यांच्या चारचाकी कारमधून त्यांचा मावसभाऊ सागर सतीश तांबोळकर, तसेच मित्र ऋषिकेश हिरामण हिरणावळे,अमित हिरामण हिरणावळे यांच्यासोबत घराकडे जात होते.

गवळीगल्लीच्या कॉर्नरला समोरून आलेल्या स्कॉर्पिओ (क्र. एमएच ४५ एन ६५९४) याच्या चालकाने भुते यांच्या कारला स्कॉर्पिओ आडवी लावली. त्यातून भुते यांचा आतेभाऊ सागर सदानंद तडवळकर (रा.कुर्डुवाडी जि. सोलापूर) याने गाडीतून खाली उतरून विनायक भुते यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. भुते यांचे मित्र व आजूबाजूचे लोक यांनी तडवळकर याला अडवण्याचा प्रयत्न केला. पण गाडीच्या चालक मित्राने त्यांना मारहाण करत शिवीगाळ करून तुला ठार मारण्याची धमकी देत भुते यांना जबरदस्तीने गाडीत बसवले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यावेळी लोकांनी अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांना देखील खून करीन असा दम दिला व भुते यांना गाडीत बसवून बस स्टॅण्डकडे ते निघून गेल.या वेळात कोणीतरी श्रीगोंदा पोलिसांना फोन करून सदर प्रकाराची माहिती दिली होती. दरम्यान आरोपीला पोलिस आपल्या मागावर असल्याचे समजल्याने त्यांनी भुते यांना गाडीतून ढकलून दिले व जामखेड रोडने ते पळून जाऊ लागले. 

तेव्हा सिध्दार्थनगर येथे पोलिसांनी त्यांच्या दुचाकी रस्त्यात आडव्या लावून आरोपींची स्कॉर्पिओ गाडी अडवली. या दोघांना ताब्यात घेतले. केवळ पोलिसांच्या तत्परतेमुळेच तरुणाच्या अपहरणाचा डाव फसला. विनायक भुते यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी सागर सदानंद तडवळकर व त्याचा मित्र अमोल उत्तम आत्तलिंगे यांच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.