सरकारला जाग आणण्याची भूमिका पत्रकार करतात : विखे पाटील

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :सरकारला जाग आणण्याची भूमिका पत्रकार करीत असतात. देशात मराठी वृत्तपत्रांना मानाचे स्थान आहे. याचे श्रेय मराठी पत्रकारांना जाते. पत्रकारितेने सामाजिक व्यवस्था उभी केली. वृत्तपत्राचे अस्तित्व कधीच संपणार नसल्याचे प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पत्रकार दिनानिमित्त प्रेस क्लब व हाजी अजीजभाई चष्मावाला प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक पत्रकारिता पुरस्कार वितरण कार्यक्रमात विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प. अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणुन पालकमंत्री प्रा.राम शिंदे, जिल्हाधिकारी अभय महाजन, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विश्­वजित माने, जिल्हा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा,अ.भा.मराठी पत्रकार परिषदेच्या विभागीय सचिव मीनाताई मुनोत, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदेचा, जि.प. सदस्या हर्षदा काकडे, डॉ.सुधा कांकरिया, प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शकूर शेख उपस्थित होते.

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
पुढे विखे म्हणाले की,येथे सरकार पोहचत नाही तेथे पत्रकार पोहचतात व त्यांच्या प्रश्­न जगासमोर आनतात. निपक्ष:पातीपणे पत्रकार आपली भूमिका मांडत असतात. सध्या सरकार व पत्रकारांमध्ये समन्वय कमी झाला आहे. सरकार विरोधी लिहिल्यास देशद्रोह ठरविण्याचा अध्यादेश आणण्यात आला होता. या अध्यादेश पत्रकारांनी हाणून पाडला. प्रगल्भ लोकशाहीसाठी निपक्षपाती व निर्भयपणे केलेली पत्रकारिता उपयुक्त आहे. पत्रकारांच्या घरांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी त्यांना भूखंड उपलब्ध करण्यास पुढाकार घेण्याचे सांगितले. तसेच पत्रकारांसाठी प्रेस क्लबने उत्तम व्यासपीठ निर्माण केल्याचे कौतुक त्यांनी केले.

बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन दीपप्रज्वलनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रेस क्लबच्या वतीने सन २०१७ मध्ये राबविण्यात आलेल्या विविध कार्यक्रम व सामाजिक उपक्रमांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविकात विजयसिंह होलम यांनी पुढील वर्षापासून पत्रकार घडविणाऱ्या पत्रकारांच्या आईच्या सन्मानासाठी मन्सूर व शकूर शेख यांच्या मातोश्रींच्या स्मरणार्थ पुरस्कार देण्यात येणार असल्याचे जाहीर केले. पाहुण्यांचे स्वागत प्रेस क्लबचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी केले.

पालकमंत्री प्रा.राम शिंदे म्हणाले की, अत्याधुनिक व सोशल मिडीयाच्या युगात वर्तमानपत्र टिकून आहेत. सकाळी उठल्यावर वृत्तपत्र वाचल्याशिवाय राहवत नाही. शालिनीताई विखे यांनी लेखणी चालविताना एखाद्याचे आयुष्य संपेल या बाजूने देखील विचार करण्याची गरज आहे. समाजातील प्रश्­नाबाबत पत्रकार जागृक असतात व त्यांच्यामुळे असलेल्या उणीवांची जाणीव होत असल्याचे त्यांनी सांगितले.

उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते सामाजिक पत्रकारिता पुरस्कार दैनिक पुण्य नगरीचे वृत्त संपादक विकास अंत्रे यांच्यासह मिलिंदकुमार साळवे, ज्ञानेश्­वर निमसे, बंडू पवार, ज्ञानेश दुधाडे, दत्ता इंगळे, शोधपत्रकारिता पुरस्कार संदीप कुलकर्णी, इलेक्ट्रॉनिक मिडीया पुरस्कार सचिन शिंदे, वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार वाजिद शेख यांना प्रदान करण्यात आला. यावेळी वर्षभरात विविध पुरस्कार मिळविणाऱ्या पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. तुषार गार्डन येथे मोठ्या दिमाखात पार पडलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी पत्रकार, माध्यमांचे प्रतिनिधी, वृत्तछायाचित्रकार व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचलन महेश महाराज देशपांडे यांनी केले. आभार संदीप कुलकर्णी यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.