तलवार बाळगणारा पोलिसांच्या जाळ्यात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर-पुणे महामार्गावर डीएसपी चौकाजवळ तलवार बाळगणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना माहिती मिळाली की, डीएसपी चौकाजवळ रोडच्या कडेला स्टॉल मांडून चपला विकणाऱ्या इसमाने एक तलवार लपवून ठेवलेली असल्याची समजले. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
त्यानूसार श्री. पवार यांच्या पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप पाटील, पोसई श्रीधर गुठ्ठे, पेाहेकॉ भाऊसाहेब काळे, पोहेकॉ मन्सुर सय्यद, पोहेकॉ सुनील चव्हाण, पोहेकॉ दत्ता हिंगडे, पोहेकॉ उमेश खेडकर, पोना संदीप पवार, पोना संदीप घोडके, पेाना दिपक शिंदे, पोकॉ अशोक गुंजाळ, पोकॉ रविंद्र कर्डीले, पोकॉ अडबल पोकॉ रोहिदास नवगिरे, पोकॉ मच्छिंद्र बर्डे व चालक पोना कोळेकर यांनी सापळा लावून कंकर रफिक सय्यद (वय ३८, रा. सय्यदनगर, सोनई, ता. नेवासा) यांस शिताफीने ताब्यात घेतले. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
त्याच्याकडे अधिक विचारपुस केली असता त्याच्या कब्जातून एक लोखंडी तलवार विनापरवाना मिळून आल्याने त्याचेवर कॅम्प पोलिस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.