आ. मोनिका राजळेंना पुन्हा सक्रीय करण्यासाठी पंकजा मुंडेंचा पुढाकार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :स्व. राजीव राजळे यांच्या निधनानंतर या दु:खातून अद्यापही न सावरलेल्या आमदार मोनिका राजळे यांनी पुन्हा राजकारणात सक्रिय व्हावे, यासाठी आता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पुढाकार घेतला असून, येत्या मंगळवारी (दि.९) स्वत: मुंडे या राजळे यांची कासार पिंपळगाव येथे भेट घेऊन राजळे यांना बाहेर पडण्याचे आवाहन करणार आहेत. राजळे या आपली दुसरी राजकीय इनिंग पुन्हा सुरू करणार असल्याचे निश्चित झाले आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
याबाबत अधिक माहिती अशी की, माजी आमदार राजीव राजळे यांचे दि. ७ ऑक्टो. १७ रोजी दु:खद निधन झाल्याने राजळे यांच्या कुटुंबावर मोठा आघात होण्याबरोबरच राजळे यांना मानणारे कार्यकर्ते चांगलेच सैरभर झाले. या घटनेला तीन महिने उलटूनही आमदार मोनिका राज़ळे या दु:खातून न सावरल्याने त्या घराबाहेर पडल्याचं नाही.

या पार्श्वभूमीवर राजळे समर्थक कार्यकर्त्यांनी राजीव राजळे व स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीचे औचित्य साधत हिंमत सप्ताह राबवत तसेच विविध उपक्रम आयोजित करत राजळे यांनी सक्रिय व्हावे, असे आवाहन केले. मात्र, तरीही राजळे या बाहेर न पडल्याने आज पाथर्डी व शेवगावचे भाजप तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, बापूसाहेब पाटेकर, नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे,पंं. स. उपसभापती विष्णुपंत अकोलकर, माजी जि. प. सदस्य सोमनाथ खेडकर हे परळीला गेले व त्यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मोनिका राजळे यांना पुन्हा सक्रिय करण्यासाठी तुम्हीच पुढाकार घ्या, असे आवाहन केल्यानंतर मुंडे यांनी आपण येत्या मंगळवार, दि. ९ रोजी कासार पिंपळगाव येथे येऊन राजळे यांच्याशी चर्चा करू व त्यांना पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय करू, असे आश्वासन दिले असल्याने आता राजळे या पुन्हा राजकारणात सक्रिय होणार असल्याचे निश्चित झाले आहे. दरम्यान, या भेटीनंतर मुंडे या राजळे यांना आपल्यासोबत नगर येथील एका कार्यक्रमाला घेऊन जाणार असल्याचे अधिक माहिती घेता समजले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.