पारनेरमध्ये अनोळखी इसमाचा तलावात मृतदेह आढळला.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील पाझर तलावात अंदाजे ४० ते ४५ वर्ष वयाच्या एका अनोखी झसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत शेतमालक जालिंदर गणपत गांगड रा. भोयरे गांगर्डा यांनी पोलिसांना माहिती दिली. अंगात काळे जर्किन, निळा शर्ट, काळपट रंगाची पँट, खिशात गाठी मारलेली प्लॅस्टिकची पिशवी अशा अवस्थेत हा मृतदेह हे दि. ३ रोजी आढळून आला.


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
घटनास्थळाला हेकॉं. सुखदेव दुर्ग यांनी भेट देऊन पंचनामा करून जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. पाण्यात पडून मृत्यू झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला. याप्रकरणी गांगड यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोनि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोना. शिवाजी कडूस करीत आहेत. मयत व्यक्तीबद्दल कोणाला काही माहिती असल्यास सुपा पोलिसांनशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.