उड्डाणपूल - आठ हजार कोटी रुपये मंजूर, भूमिपूजनाच्या दिवशीच काम !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरातील प्रास्ताविक उड्डाणपुलासाठी केंद्रीय नितीन गडकरी यांनी सुमारे आठ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. या पुलाच्या कामाचे भूमिपूजन ज्या दिवशी होईल त्याच दिवशी काम सुरू होईल. त्यानुसार नियोजन सुरू असून, आता यात कोणताही किंतू, पंरतु येणार नाही', अशी माहिती पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नगर शहरातील उड्डाल पुलाच्या कामाबाबत पत्रकार परिषदेत प्रा. राम शिंदे यांनी माहिती दिली. उड्डालपूलाचे काम नक्की होणार का, या प्रश्नावर त्यांनी वरील माहिती दिली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
प्रा. शिंदे म्हणाले, 'नगर शहरातील उड्डालपुलाचे कामात आता किंतू, परंतु येणार नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कामाची शैली सर्वश्रूत आहे. त्यांनी या पुलासाठी सुमारे आठ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.' या पुलाच्या आराखडा तयार करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला डिसेंबरपर्यंत सांगितले होते. त्यावर या विभागाने काय कार्यवाही केली, याचा आपण स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

या उड्डाणपुलाविषयी अगोदर अनेकदा नारळ फोडले गेले, घोषणा झाल्या पण प्रत्यक्षात कार्यवाही काही झाली नाही. यावर प्रा. शिंदे म्हणाले, 'नितीन गडकरी यांनी स्वत: या कामात लक्ष घातले आहे. ज्या दिवशी भूमिपूजन होईल, त्याच दिवशी काम सुरू होईल, असे त्यांचे नियोजन आहे. त्यामुळे उड्डाणपुलाबाबत आता विश्वास ठेवायचाच विषय आहे.' दरम्यान, नगर जिल्ह्यातून सुमारे ७०० किलोमीटरचा महामार्ग जात आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय महामार्गाचे कार्यालय नगरमध्ये होत आहे. या कार्यालयामुळे कामात सुसूत्रता येण्यास मदत होईल, असे देखील पालकमंत्री शिंदे यांनी सांगितले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
नगर-पुणे-औरंगाबाद-दौंड-मनमाड महामार्गावरील अतिक्रमणांवर कारवाई करण्यासाठी प्रशासनाची स्वतंत्र बैठक घेणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. नगर शहरातील अतिक्रमणांची परिस्थिती खूपच गंभीर आहे. कितीही कारवाई केली, तर ती पुन्हा आहे, तशीच होतात. महापालिका प्रशासनाला पत्रव्यवहार करून देखील दखल घेतली जात नाही, याकडे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी लक्ष वेधले. पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी यावर महापालिका प्रशासनाला तत्काळ कारवाई करण्याची सूचना देत पोलीस अधीक्षकांना बंदोबस्त उपलब्ध करून देण्यास त्यांनी सांगितले.

बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्ती निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, प्रत्यक्षात दहा जानेवारीपासून कामाला सुरूवात होणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी दिली. बाह्यवळण रस्त्याची दुरावस्था झाली असून, यामुळे गंभीर अपघात होत आहेत. त्यामुळे जड वाहने नगर शहराबाहेरून जाण्याऐवजी शहरातून जात आहे. परिणामी वाहतूक कोंडी होते. त्यात शहरातून गेलेल्या महामार्गांवर अतिक्रमणे वाढली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीत अधिकच भर पडते. प्रा. शिंदे यांनी यावर बाह्यवळण महामार्गाच्या दुरूस्तीसाठी निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून, हे काम लवकरच सुरू होईल, असे सांगितले. त्याचबरोबर हे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण करून घेण्याचा प्रयत्न राहिल, असे त्यांनी स्पष्ट केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.