कर्जत, जामखेड बाजार समितीस पाच कोटींचा निधी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राष्ट्रीय कृषी विकास प्रकल्प योजनेंतर्गत कर्जत व जामखेड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध विकासकामांसाठी तब्बल ५ कोटी ६९ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला आहे.पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या माध्यमातून बाजार समित्यांसाठी हा भरीव निधी मंजूर झाला असल्याने बाजार समिती अंतर्गत विविध विकासकामे व सोयी सुविधा नव्याने उपलब्ध होणार आहेत. हळगावच्या कृषी विद्यापाठोपाठ परत ५ कोटी ६९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
जामखेड बाजार समितीसाठी सर्वाधिक ३ कोटी २३ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यात आडते, व्यापारी व खरेदीदार यांचेसाठी ट्रेडींग शॉप्स इमारत बांधकाम १ कोटी ४० लाख ८५ हजार ४०० रूपये, कॅटिंन व शेतकरी निवास इमारत ५२ लाख ६ हजार ३०० रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. जामखेड बाजार समितीअंतर्गत खर्डा उपबाजार समितीसाठी आडते, व्यापारी व खरेदीदारांसाठी ट्रेडिंग शॉप्स इमारत बांधकाम १ कोटी ६ लाख ९३ लाख १०० रूपये, इलेक्ट्रॉनिक वजन काटे बसविणे १३ लाख ५५ हजार ९०० रूपये, शौचालय इमारत बांधकाम ७ लाख ४६ हजार ७०० रूपये, खर्डा उपबाजार समिती कार्यालय नूतनीकरण १ लाख ८१ हजार २०० रूपये. कर्जत बाजार समितीसाठी २ कोटी ४६ लाखांचा निधी.

सेल हॉल बांधकामासाठी ३६ लाख ३ हजार ६०० रूपये, इलेक्ट्रॉनिक वजन काटा १३ लाख ५४ हजार २०० रूपये, शौचालय इमारत बांधक ७ लाख ४२ हजार ९०० रूपये. राशीन उपबाजार समितीसाठी प्रमुख यार्डात सेल हॉल बांधकामासाठी ३६ लाख ७०० रूपये, इलेक्ट्रॉनिक वजन काटा बसविणे १३ लाख ५४ हजार २०० रूपये , शौचालय इमारत बांधक ७ लाख ४२ हजार ९०० रूपये. कर्जत उपबाजार समिती अंतर्गत मिरजगाव उपबाजार समितीसाठी प्रमुख यार्डात सेल हॉल इमारत बांधकामासाठी २६ लाख ३९ हजार १०० रूपयांचा निधी.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
आडते, व्यापारी व खरेदीदार याचेसाठी गोडावून इमारतीसाठी १ कोटी ५ लाख ८५ हजार रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीच्या माध्यमातून बाजार समितीअंतर्गत विविध सोयी सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. इलेक्ट्रॉनिक वजन काटा, शेतकरी निवास, कँटिंन, शौचालय, गोडावून या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा उपलब्ध होणार आहे.यामुळे शेतीमाल लवकरात लवकर विक्री करणे तसेच अचूक वजन करणे अशा सुविधा मिळणार आहे. गोडावूनची क्षमता वाढल्याने केवळ जागेअभावी बंद होणारी शेतीमाल खरेदी बंद होणार नाही.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.