बजेट रजिस्टरची चौकशी झाल्यास अनेक घोटाळे बाहेर येतील - आ.संग्राम जगताप.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर महापालिकेतील बजेट रजिस्टरच घोटाळ्याचे मूळ आहे. सत्ताधाऱ्यांची हिंमत असेल, तर ते उघडे करा. शासनाच्या चौकशीला समारे जा. या बजेट रजिस्टरची चौकशी झाल्यास अनेक घोटाळे बाहेर येतील, असा दावा आमदार संग्राम जगताप यांनी केला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
महापालिकेच्या पथदिव्यांच्या कामातील सुमारे ४० लाख रुपयांच्या घोटाळ्यांवरून माजी आमदार अनिलभैय्या राठोड यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जगताप यांना टार्गेट केले. आमदार जगताप यांनी या आरोपाचा पत्रकार परिषद घेऊन खंडण करत महापालिकेतील बजेट रजिस्टरच्या चौकशीची राज्य सरकारकडे मागणी केल्याचे सांगत सत्ताधारी शिवसेनेची चांगलीच कोंडी केली आहे.

आमदार जगताप म्हणाले, 'महापालिकेच्या अंदाजपत्रकाप्रमाणे विकास कामांची नोंद बजेट रजिस्टरमध्ये केली जाते. हेच बजेट रजिस्टर नेमके कोठे ठेवले जाते, कोठे ठेवायचे असते, आता ते कोठे आहे याचा शोध घेणे आवश्यक आहे. पथदिव्यांतील कामांची नोंद बजेट रजिस्टरमध्ये झाली होती की नाही, नसल्याच त्याची कारणे आणि जाणिवपूर्वक केली नसल्यास त्या मागील वेगळी कारणे यांचा शोध घेतला गेला पाहिजे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
स्थायी समितीत हा घोटळ्याचा विषय चर्चेला आल्यानंतर तेथे हे रजिस्टर बोलविले गेले. पण, तेथे सुमारे दीड ते दोन तासानंतर हे रजिस्टर आले. एका दालनातून दुसऱ्या दालनात हे रजिस्टर आणण्यासाठी एवढा वेळ लागलाच कसा, असा प्रश्न देखील आमदार जगताप यांनी उपस्थित केला.

काही महिन्यांपूर्वी शहरात बाकडे बसविण्याचा घोटाळा उघडकीस आला होता. त्यावरून चर्चा तापल्यावर सत्ताधाऱ्यांनी ही बाकडे रातोरात्र बसवली. पथदिव्यांच्या कामात त्याच गोष्टींची पुन्हा उजळणी होत आहे. जनतेचे सेवा करणारे मेवा खाऊ लागल्याने त्याला कोठे तरी लगाम लागली पाहिजे यासाठी या रजिस्टरची थेट राज्य सरकारने चौकशी करावी, अशी मागणी आपण मुख्यमंर्त्यांकडे केल्याची माहिती आमदार जगताप यांनी दिली. 

राज्य सरकारने या बजेट रजिस्टरच्या चौकशीसाठी समिती नेमावी, अशी आग्रही मागणी आपण केली आहे. राज्य सरकारची समिती आल्यावर सगळेच घोटाळे बाहेर येतील. या प्रकरणात महापौर कार्यालयावर देखील अप्रत्यक्षपणे आरोप होत आहे. त्याचे खंडण करण्याची हिंमत एकाही सत्ताधारी पदाधिकाऱ्याने केलेली नाही. त्यामुळे कुठे तरी घोटाळ्याचे बीज महापौर कार्यालयात पडलेले असल्याचा आरोप देखील आमदार जगताप यांनी यावेळी केला.

दरम्यान, संपत बारस्कर यांनी या कामांबाबत आपण काहीच सुचविले नसल्याचे स्पष्ट केले. शिवसेना दाखवित असलेले कागद खोटे आहेत. पथदिव्यांच्या कामाचे मागणी करणारे पत्र आपले असल्यास आपण पदाचा राजीनामा देऊ असे देखील ते म्हणाले. या पत्राच्या तपासणीसाठी आवक-जावक रजिस्टरला चौकशी करावी. सत्य काय आहे, ते समोर येईल, असे देखील ते म्हणाले.

तक्रार केली नसती !.
ठेकेदार हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पदाधिकारी असल्याचा आरोप होत आहे. याबाबत समोरच्यांचा अभ्यास किती कच्चा आणि अपूर्ण आहे, याची आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी खिल्ली उडवली. ते म्हणाले, 'ठेकेदाराला पाठिशी घालायचे असते, तर यासंदर्भात थेट राज्य सरकारकडे तक्रार केली नसती.' या ठेकेदाराचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची काडीमात्र संबंध नाही. ठेकेदार सचिन लोटके याला पक्षाच्या कोणत्याही पदाचे नियुक्त पत्र दिलेले नाही. उलट त्यानेच महापौर कार्यालयावर गंभीर आरोप केले आहेत. त्याची चौकशी पारदर्शपणे झाली पाहिजे. शिवसेनेची सत्ता असल्याने अधिकारी या प्रकरणाची चौकशी दबावाखाली करत आहेत, असे देखील ते म्हणाले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.