दौंड नगर रोडवर अज्ञात ट्रकच्या धडकेत एकजण ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे आज दौंड नगर रोडवर शुक्रवार दि.५ रोजी मध्यरात्री अज्ञात ट्रकने दिलेल्या धडकेत एकजण जागीच ठार झाला. याबाबत पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे हे करत आहेत. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
श्रीगोंदा तालुक्यातील अजनूज मधील आपल्या शेतीचे कामकाज पूर्ण करून अजनूज वरून दौंड कडे जाण्यासाठी ओमिनी क्र एमएच १२ पी य ६१७१ या गाडीतून पुण्याला जाण्यासाठी निघालेले भाऊ देविदास बनकर रा.कसबा पेठ हे मध्यरात्री काष्ठी येथील माऊली हॉस्पिटल जवळ आले असता. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
ही माहिती श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांना मिळताच तात्काळ त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आणि पंचनामा करून मृतदेह शविच्छेदन करण्यासाठी श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. आज दुपारी शविच्छेदन पूर्ण झाल्यावर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे हे करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.