अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या आरोपावरुन विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले यांनी आरोपी विष्णू चंद्रय्या येदुल्ला (वय ३५, रा. खिलागणपूर, ता. वनापरती, जि. महेबूबनगर, तेलंगणा, अटकेच्यावेळी राहणार केडगाव, अ.नगर) याला दोषी धरुन नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप व ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. सदर दंडाच्या रक्कमेतून ४५ हजार रुपये पिडीत मुलीस नुकसान भरपाई देण्याचा आदेश न्यायालयाने दिला. या खटल्यात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल ॲड. सतीश पाटील यांनी काम पाहिले. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, सन २०१४ मध्ये पिडीत मुलगी आईसह केडगाव येथे भाड्याच्या घरात रहात होती. पिडीत मुलीचे आई-वडिल हे वाद झाल्याने विभक्त रहात होते. दरम्यान पिडीतेच्या शेजारी राहणाऱ्या आरोपी विष्णू येदुल्ला याने पिडीतेच्या आईशी अनैतिक संबंध ठेवले होते. कालांतराने दोघे पती-पत्नी असल्याचे सांगत होते. त्यावेळी पिडीत मुलगी अवघ्या दहा वर्षाची होती. मात्र आई व आरोपी यांच्यात चाललेला प्रकार तिने पाहिला होता. त्यामुळे आरोपीने तिला धमकी दिली होती.

दरम्यान पिडीत मुलीची आई गावाला गेली असता या नराधमाने पिडीतेवर वारंवार अत्याचार केला. जर घडलेला प्रकार कोणाला सांगितला तर तुझ्या आईला व भावाला ठार मारु अशी धमकी देऊन त्याने पिडीतेला मारहाण केली होती. हा प्रकार तिने आईला सांगितला. मात्र तिने दुर्लक्ष केले. दरम्यान ५ जानेवारी २०१५ रोजी पिडीत मुलीची आई मयत झाली. त्यानंतर दोन्ही मुले वडिलांकडे गेले. तेथे मुलीच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिला पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

त्यावेळी ती गरोदर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यानंतर पिडीत मुलीच्या वडिलांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विष्णु येदुल्ला याला अटक केली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक सविता सदावर्ते यांनी करुन दोषारोप पत्र न्यायालयात दाखल केले. या दरम्यानच्या काळात पिडीत मुलीने बाळास जन्म दिला. त्याला स्नेहालयात निवारा देण्यात आला होता. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN
------------------------------------
या खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा न्यायाधीश श्रीमती सुवर्णा केवले यांच्यासमोर झाली. सरकार पक्षातर्फे एकूण ११ साक्षीदार तपासले. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, स्नेहालयातील संतोष धर्माधिकारी, पिडीत मुलगी, तपासी अधिकारी, पोलिस कर्मचारी कैलास सोनार, दादासाहेब बोरुडे, अप्पासाहेब डमाळे, ॲड. विनोद चव्हाण यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. 

सरकार पक्षाच्या वतीने ॲड. पाटील यांनी घटना संवेदनशील असून सबळ पुरावे असल्याचे सांगून प्रबळ युक्तीवाद केला. यावेळी आरोपी पक्षाच्यावतीने वकिलांनी डीएनएवर आक्षेप घेतला. त्यामुळे एक वर्ष खटल्याचे कामकाज थांबविण्यात आले होते. त्यानंतर नव्याने डीएनए अहवाल दाखल केला असता आरोपी दोषी मिळून आला. 

न्यायालयानेआरोपी विष्णू येदुल्ला याला दोषी धरुन भादवि कायदा कलम ३७६ २ (एच) (एम) लहान बालकांचे लैगिंक अत्याचारापासून संरक्षण कायदा (पोक्सो) कलम ५ जे (२), ५ (एल) व ६ अन्वये नैसर्गिक मृत्यूपर्यंत जन्मठेप व ५० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्षाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली. तसेच भादवि कलम ३५४ अ (१) अन्वये तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेतून ४५ हजार रुपये पिडीत मुलीस नुकसान भरपाई देण्यात न्यायालयाने दिला. 

ॲड. सतिष पाटलांच्या कारकिर्दीतील ६५ वी जन्मठेप.
जिल्हा सरकारी वकील ॲड. सतीश पाटील यांच्या कारकिर्दीत ही ६५ वी जन्मठेप शिक्षा असून सन २०१८ या नवीन वर्षातील जिल्हा न्यायालयातील ही पहिलीच जन्मठेप शिक्षा देण्यात आली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस कर्मचारी हुशारे यांनी काम पाहिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.