विशाल गणपती मंदिर ट्रस्टला ९९ वर्षाच्या कराराने जागा मिळणार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :विशाल गणपती मंदिराच्या दक्षिणेकडील जागा भाडेतत्त्वावर देण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. नगरचे ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीला ही जागा नाममात्र एक रुपये भाडे कराराने देण्याचे सूचित केले होती. परंतु, कायदेशीर बाबींची अडचण असल्याचे सहाय्यक नगर रचनाकार संतोष धोंगडे यांनी सांगितले. 


----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
बाजारमूल्यापेक्षा कमी दराने कोणाला जागा देता येणार नाही, असा कायदा सांगतो. मात्र, सभागृहाला या भाडे करारात काही टक्के सवलत सुचविता येईल. त्यानुसार सभागृहाने भाडे कराराच्या मूल्यावर दहा टक्के सवलत सुचविली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
वार्षिक भाडे सुमारे ६५ हजार रुपये आहे. यावर दहा टक्के सवलत मिळणार आहे. त्याचप्रमाणे ही जागा विशाल गणपती मंदिराला सुमारे ९९ वर्षे कराराने देण्याचा ठराव करण्यात आला. महापौर सुरेखा कदम यांनी ही जागा ९९ वर्षाच्या कराराने आणि दहा टक्के सवलतीने विशाल गणपती मंदिर ट्रस्टला देण्यात येत असल्याचे मंजूर केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.