तरूणीची राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नगर शहरातील बेलदार गल्ली येथे दुपारी दोनच्या सुमारास तरूणीने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कल्याणी संपत गवते या तरूणीने सर्जेपुरा येथील बेलदार गल्लीतील घरामध्ये आत्महत्या केली. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ही तरूणी येथील न्यू आर्टस महाविदयालयात शिकत असल्याची माहिती मिळाली असून तरूणीचा भाऊ अमित अशोक गवते याने आत्महत्या केल्यानंतर दुपारी येथील जिल्हा रूग्णालयात दाखल केले.मात्र डॉक्‍टरांनी तिला मृत घोषित केले. या तरूणीने आत्महत्या का केली याबाबत मृत्यूचे कारण समजू शकले नाही. तरी तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस सुत्रांकडून मिळाली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.