कॅमेऱ्याचे फुटेज पहा..कोणाच्या हातात अपहारातील फाईल दिसते!

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पथदिव्यांच्या कामातील 40 लाख रुपयांच्या अपहाराचे प्रकरण आज पुढे सुरू झालेल्या महासभेत पुन्हा चांगलेच गाजले. गोरगरिबांना पाणी व घरपट्टीसाठी वेठीस धरले जाते. मात्र, पालिकेत 40 लाखांचा अपहार होतो. ठेकेदार महापौरांवरच आरोप करत फिरतो. अधिकारी नगरसेवकांच्या विरोधात सामूहिक रजेचे हत्यार उपसतात. पालिकेतील फाईल गायब होतेय. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
कारवाई करण्याबाबत मागील सभेपासून आतापर्यंत चार दिवस प्रशासनाने वाया घालवले आहेत. यातून चुकीचा संदेश नगरच्या जनतेत जात आहे,’ अशा शब्दांत विविध नगरसेवकांनी पथदिवे अपहार प्रकरणात आक्रमकपणे म्हणणे मांडण्यास सुरुवात करताच सभा सुरू झाली. कॅमेऱ्याचे फुटेज काढून पहा, कोणत्या अधिकाऱ्याच्या हातात फाईल दिसते, अशी मागणी दीप चव्हाण यांनी केली.

ठेकेदार सचिन लोटके यांनी या कामाबाबत अपहार केल्याचा सभेचा सुरुवातीपासून सूर आहे. तसेच, सभेच्या कामकाजाबाबत बाहेरील माणूस कसा बोलतो, असा प्रश्‍न कैलास गिरवले यांनी उपस्थित केला. तर, कामावर अधिकाऱ्यांनी बहिष्कार घातला असेल तर त्यांचा तो कालावधी पगारी की बिनपगारी धरणार याचा खुलासा करण्याची त्यांनी मागणी केली. 
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
गणेश भोसले यांनी प्रभागात टाकलेली कामे नगरसेवकांना माहीत झाली पाहिजेत. तसे न झाल्यानेच 40 लाखांच्या अपहार प्रकरणांसारख्या घटना होतात. त्यातून नगरसेवकांची बदनामी होते. यामुळे एखाद्याचे राजकीय जीवन उद्‌ध्वस्त होऊ शकते, असा मुद्दा उपस्थित केला. 

महापौरांनी यावेळी चर्चेचा सूर बदलू नये म्हणून हस्तक्षेप करत येथून पुढे कामांची माहिती नगरसेवकांना देण्याचा आदेश दिला. तर, सभागृहात अपहार प्रकरणात चर्चा वारंवार भरकटणे म्हणजे लोटकेने केलेल्या अपहाराला पाठिशी घालण्यासारखे आहे. विषयाचे गांभीर्य ओळखून चर्चा व्हावी, नागरिकांचा पैसा असा चुकीच्या मार्गाने जाऊ नये. लोटकेवर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी अनेक नगरसेवकांनी केली.
-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.