श्रीगोंदा - काष्टी रोडवरील अपघातात एकजण ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :श्रीगोंदा- काष्टी रोडवर कृषी खात्याच्या शासकीय रोपवाटिकेजवळ स्विफ्ट कारला झालेल्या अपघातात तालुक्यातील म्हातार पिंपरी येथील अंकुश पांडुरंग हिरडे(वय २७) यांचा मृत्यू झाला. हा अपघात दि.२ जानेवारी रोजी रात्री साडेआठच्या सुमारास झाला. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
म्हातार पिंप्री येथील अंकुश हिरडे हे काल. दि.२ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारने श्रीगोंद्याहून काष्टीकडे चालले होते. शासकीय कृषी रोपवाटिकेजवळ त्यांची कार आली असता, रस्त्यावर असलेल्या दगडावर कार आदळून कार शेतात पलटी झाली. या वेळी हिरडे हे गंभीर जखमी झाले. त्यांना नागरिकांनी तातडीने काष्टी येथे दवाखान्यात नेले. परंतु गंभीर असल्यामुळे त्यांना उपचारासाठी पुणे येथे घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. 

उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरच्या चाकाला उटी लावण्यासाठी वापरलेला दगड तसाच रस्त्यात ठेवल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते. या अपघातात गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. आज सकाळी म्हातार पिंप्री येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अंकुश हिरडे यांचे चार महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. त्यांच्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

ऊस वाहतूक करणाऱ्या चालकांवर कारवाईची गरज.
अशाप्रकारे रस्त्यात या ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाने उटीसाठी वापरलेला दगड ररस्त्यातच ठेवल्यामुळे हिरडे यांना आपला ज़ीव गमवावा लागला. यामुळे अशाप्रकारे उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.