खंडणी मागितल्याप्रकरणी ॲड. गर्जे यांच्यावर गुन्हा दाखल .

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :औरंगाबाद उच्च न्यायालयातील जनहित याचिका मागे घेण्यासाठी खंडणी मागून धमकी दिल्याप्रकरणी ॲड. हरिहर विजय गर्जे रा. दुलेचांदगाव, ता. पाथर्डी यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष देवीदास खेडकर हे 2011 साली एकनाथवाडीचे सरपंच होते. त्यावेळी त्यांनी गावच्या विकासासाठी रोजगार हमी योजनेतून विविध कामे केली होती. ही कामे नियमानुसार केली असल्याचे देवीदास खेडकर यांचे म्हणणे आहे. तर रोजगार हमीच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची एकनाथवाडीतील भाजपाचे कार्यकर्ते बाबा भगवान सानप यांची तक्रार आहे. 

देवीदास खेडकर व पंचायत समितीचे अधिकारी यांनी रोजगार हमीच्या कामात भ्रष्टाचार केल्याची जनहित याचिका बाबा सानप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली आहे. ही याचिका मिटवून देण्याकरिता ॲड. हरिहर विजय गर्जे यांनी खेडकर व पंचायत समितीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना वेळोवेळी पैशांची मागणी केली. 

दि. २५ डिसेंबर 2017 रोजी गर्जे यांनी खेडकर यांना सकाळी नऊ वाजता पंचायत समितीच्या पटागंणात बोलाविले.त्यानुसार खेडकर हे भरत सानप व दादा मोरे यांच्यासोबत गर्जे यांना भेटण्यासाठी गेले. खेडकर यांच्या विरोधातील औरंगाबाद येथील न्यायालयातील याचिका मिटवायची की नाही, असे विचारून मला पाच लाख रुपये द्या, मी इतर प्रकरणांप्रमाणे प्रतिज्ञापत्र देऊन हे प्रकरण संपवून टाकीन. 

नाहीतर मी बातम्यांची मालिका लावून तुमची बदनामी करीन, अशी धमकी दिली. खेडकर यांनी बदनामी नको म्हणून मोरे व सानप यांच्याशी चर्चा करून चार लाख रुपये देण्याचे ठरविले. दि. 26 डिसेंबर 2017 रोजी दुपारी दोन वाजता खेडकर यांनी पंचायत समिती समोरील रस्त्यावर मोरे व सानप यांच्या समक्ष हरिहर गर्जे यांना एक लाख रुपये दिले व उर्वरित तीन लाख रुपये एक महिन्यात देण्याचे ठरले. 

त्यानंतर गर्जे यांनी राहिलेले तीन लाख रुपये देण्याचा तगादा खेडकर यांच्याकडे लावला. आताच तीन लाख रुपये द्या, नाहीतर बातमी छापून तुमची बदनामी करील, अशी धमकी दिली. याबाबत देवीदास खेडकर यांनी मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांत तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी गर्जे यांच्या विरुद्ध खंडणी मागणे व धमकी देण्याबाबतचा गुन्हा नोंदविला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.