बाळासाहेब बोराटे यांच्याकडून इतिवृत्तात बोगस विषय घुसविले असल्याचा आरोप

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :अहमदनगर महापालिकेच्या महासभेसमोर सात इतिवृत्त कायम करण्याचा विषय आयुक्तांनी प्रशासकीय पातळीवर निर्णय घ्यावा, असे सभागृहाने आज सूचविले. महापालिका अधिनियमातील ७३ (ब) नुसार ९० दिवसांपेक्षा अधिक काळ झालेल्या इतिवृत्ताची जबाबदारी प्रशासकीय पातळीवर आयुक्तांची असते. त्यामुळे इतिवृत्तावर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
महापौर सुरेखा कदम यांच्या अध्यक्षतेखाली महासभा झाली. विषय पत्रिकेवर पहिलाच विषय मागील इतिवृत्त मंजूर करण्याचा होता. त्यात १४ जून, १९ नोव्हेंबर, सात डिसेंबर, २२ डिसेंबर २०१६, २७ मार्च २०१७, १४ सप्टेंबर २०१७ रोजी इतिवृत्तांचा समावेश होता. यावर सभागृहात चर्चा सुरू होताच विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे यांनी प्रशासनाला दिलेल्या लेखी पत्राकडे लक्ष वेधले. 

१४ जून, १९ नोव्हेंबर, सात डिसेंबर, २२ डिसेंबर २०१६, २७ मार्च २०१७, १४ सप्टेंबर २०१७ रोजी झालेल्या महासभा अजेंड्यांवर विषयाचे इतिवृत्त कायम करण्यास मान्यता आहे. परंतु वरील तारखेस अजेंड्या व्यक्तिरीक्त जे विषय बोगसरित्या घुसडण्यात आलेले आहेत, त्यांना मान्यता नाही, असे त्यांनी त्यात म्हटले होते. नगसेविका कलावती शेळके, सुनीता भिंगारदिवे, नगरसेवक मुद्दसर शेख यांनी हे निवेदन महापौर यांना दिले. यावर बोगस विषय कोणते हे सभागृहासमोर आणले पाहिजे, अशी मागणी करण्यात आली.

दीप चव्हाण यांनी यावर प्रशासनाला विचारणा केल्यावर इतिवृत्ताच्या तारखा वाचण्यास सांगितल्या. त्यात त्यांनी महापालिका अधिनियमतील तरतुदींचा संदर्भ देत ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस झालेल्या इतिवृत्त सभागृहासमोर ठेवता येत नाही, असे स्पष्ट केले. महापालिका अधिनियमातील तरतुद ७३ (ब) नगरसचिवांना वाचण्यास सांगिले. नगरसचिवांनी त्यास दुजोरा दिला. 

या तरतुदीनुसार हे इतिवृत्त कायम करण्याची जबाबदारी प्रशासकीय पातळीवर आयुक्तांकडे जाते. त्यामुळे हे इतिवृत्त कायम करण्यास सभागृह बांधिल नसल्याचे सांगत आपला याला वैयक्तिक विरोध असल्याची भूमिका दीप चव्हाण यांनी स्पष्ट केली. ॲड. अभय आगरकर, अनिल शिंदे, दिलीप सातपुते, सचिन जाधव, कैलास गिरवले, गणेश भोसले आदींनी दीप चव्हाण यांच्या भूमिकेशी सहमती दर्शवली. आयुक्त घनश्याम मंगळे यांनी या मुद्यावर अभ्यास करत ही जबाबदारी प्रशासकीय पातळीवर असल्याचे मान्य केले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.