वडगाव गुप्ता शिवारात अपघातात एक जखमी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :वडगाव गुप्ता शिवारात अपघात झाल्याची घटना घडली असून, या धडकेत एक जण जखमी झाला आहे. याबाबतची माहिती अशी, संताराम नारायण रायकर (रा. पिंपळगाव  माळवी, ता.जि. अ.नगर) यांना वडगाव गुप्ता येथील द्वारकानाथ कपड्याच्या शोरूमसमोर अज्ञात मिनी बसचालकाने दुपारी 2 च्या सुमारास भरधाव वेगाने येत जोराची धडक दिल्यामुळे त्यांच्या उजव्या पायास व बरगडीस जबर मार लागला. यावेळी वाहनचालक घटनास्थळा वरून पसार झाला. या प्रकरणी अज्ञात चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.