आर्ट ऑफ लिव्हिंग व युवाचेतना फाउंडेशन तर्फे पोलीस बांधवांचा सन्मान.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :जे पोलिस आयुष्यभर आपल्या घरादारकडे लक्ष न देता कुठल्याही प्रकारचा सण वार साजरा न करता सामाजाची सेवा करतात , तळागाळापर्यंत जाउन विविध प्रकारचे कार्य करतात आणि त्यांच्या या कार्याची उतराई व्हावी म्हणुन आपल्या बांधवांना गुलाबपुष्प देउन त्यांचे धैर्य व कामाचा उत्साह वाढवण्यासाठी गेल्या वर्षी हा उपक्रम अमर भैया कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली हाती घेतला होता. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
आर्ट ऑफ लिव्हिंग व युवाचेतना फाउंडेशन गेल्या वर्षीपासुन २ जाने रोजी पोलिस दिनानिमित्त पोलिसांची सेवेची उतराई व्हावी आणि पोलिसांना आपल्या सोबत कुणीतरी आहे याची जाणीव व्हावी , एर्हवी समाजाची पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टीकोण वेगळा आसतो मात्र परवाच्या या प्रकारामुळे आपले पोलिस बांधव चौकाचौकात उभे राहुन आपले कर्तव्य बजावताना आपण पाहत आहोत. 

पोलिस बांधवांना रात्री ८ वाजता फूड पॅकेट व रात्री २ वाजेपर्यंत चौकाचौकात थंडीत उभे राहुन आपले कर्तव्य बजावत असनाऱ्या बांधवांना चहा वाटप करुन त्यांच्या कार्याची उतराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आर्ट ऑफ लिव्हिंग व युवाचेतना फाउंडेशन च्या तरुणांनी केला. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पोलिस उपअधिक्षक अक्षय शिंदे हे उपस्थित होते तसेच जळगाव, नंदुरबार, धुळे येथुनही पोलिस बांधव व अधिकारी उपस्थित होते.

पोलीस उन्हात, पावसात ,थंडीत चौका चौकात उभे राहुन आपली सेवा करतात त्यांना चौकाचौकात जाउन त्यांचे आभार मानले .यावेळी त्यांच्या चेहर्यावर एक प्रकारचे सामधान होते ,आनंद होता .त्यानी समाधानची भावना व्यक्त केली म्हणुन त्यांची या सेवेची उतराई होणे हे आपले कर्तव्य आहे. असे मानुन आपण हा उपक्रम हातात घेत आहोत आणी यशस्वी पणे पार पाडत आहोत याचे आम्हाला समाधान आहे .असे अमर कळमकर यावेळी म्हणाले. 

यावेळी पीएसआय एस बी नागवे, सोने, सनस, धुळे येथील शिरसाठ आदी उपस्थित होते यावेळी त्यानी त्यांनी या तरुणांच्या शुभेच्छांचा स्वीकार करत त्यांच्या भावी आयुष्यासाठी व नवीन वर्षांच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी अमर कळमकर, सागर शिंदे, योगेश काकडे, एकनाथ सारुक, तुशार केदार , अदिनाथ खरात, निलेश अनुसे, गणेश दारकुंडे, गजेंद्र सोनवने, गणेश ठोंबरे, अमोल जाधव आदी उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.