राष्ट्रवादीच्या मनपा गटनेतेपदी संपत बारस्करच !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी नगरसेवक संपत बारस्कर यांच्यावर नाशिक विभागीय आयुक्तांनी शिक्कामोर्तब केला आहे. आमदार संग्रामभैय्या जगताप यांचे ते निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. विभागीय आयुक्तांच्या पत्रामुळे समदखान यांचे पद रद्द झाले आहे.
----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
राष्ट्रवादी कॉंग्रेस व अपक्षांच्या शहर विकास आघाडीची गटनोंदणी झाली होती. समदखान यांची या गटाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. महापौर पदाच्या निवडीवेळी समदखान यांनी युतीचा छुपा पाठिंबा दिला. त्यामुळे आमदार संग्रामभैय्या जगताप यांनी त्याची दखल घेत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदी संपत बारस्कर यांचे नाव पुढे केले.

विभागीय आयुक्तांकडे गटनेते पद बदलीचा प्रस्ताव २७ जून २०१६ सादर करण्यात आला. या बदलाची दखल आयुक्तांनी आज घेतली. तीस दिवसांच्या आत बदलाचा प्रस्ताव आल्याने त्याची नोंद झाल्याने विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी महापालिकेला कळविले आहे.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या या पत्र कार्यवाहीमुळे समदखान यांच्या पद निवड रद्द झाल्यात जमा आहे. दरम्यान, स्थायी समिती सदस्य निवडीचे गुऱ्हाळ सुरू आहे. या तोंडवर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या गटनेतेपदावर शिक्कामोर्तब झाल्याने संपत बारस्कर यांना गटनेता म्हणून स्थायी सदस्य निवडीचे अधिकार मिळणार आहेत. या शिक्कामोर्तबमुळे बंडखोरांना चाप बसला आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.