वाळू तस्करांवरील कारवाईत ६४ लाखांचा मुद्देमाल नष्ट.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन व दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या पथकाने भीमानदीपात्रात वाळू तस्कारांविरुद्ध केलेल्या कारवाईत 15 बोटी व 1 सक्शन बोट, असा ६४ लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. ही कारवाई आज दि. ३० रोजी करण्यात आली. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
भीमा नदीपात्रात मोठया प्रमाणात अवैध वाळूउपसा सुरू असल्याची माहिती तहसीलदार महेंद्र महाजन यांना समजली. त्यांनी ही माहिती दौंडच्या तहसीलदारांना देऊन वाळूतस्करांवर संयुक्त कारवाई करण्याचे ठरवले. त्यानुसार आज त्यांनी दौंड, श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीवर असलेल्या आलेगाव, आर्वी, अनगरे, देऊळगाव राजे या परिसरातील भीमानदीपात्रात अवैध वाळूउपसा करणाऱ्यांवर धडक कारवाई केली. 

या वेळी अवैध वाळूउपसा करणाऱ्या 15 फायबर बोटी आणि सक्शन बोट असा एकूण ६४ लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई श्रीगोंद्याचे तहसीलदार महेंद्र महाजन व दौंडचे तहसीलदार बालाजी सोमवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत मंडल अधिकारी वाघमारे, लिपक गोरे, संजय स्वामी, भानुदास येडे, तलाठी सुनील जाधव, हरिश्चंद्र फरांदे आदींनी सहभाग घेतला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.