शिर्डी नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर यांचा राजीनामा.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. साईसमाधी शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमिवर नूतन उपनगराध्यक्ष कोण होईल याकडे शिर्डीकरांचे लक्ष लागले आहे.नगरपंचायत निवडणुकीनंतर युवानेते डॉ. सुजय विखे पाटील यांनी प्रतीवर्षी नवीन उपनगराध्यक्ष पद बदलण्याचे जाहीर केले होते. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
विद्यमान उपनगराध्यक्ष जगन्नाथ गोंदकर यांचा वर्षभराचा कालावधी महिन्यापूर्वीच संपला होता. मात्र, विषय समिती निवड झाल्यानंतर राजीनामा देण्याचे डॉ. विखे यांची सूचना असल्याने एक महिना उशिरा गोंदकर यांनी आपल्या पदाचा नगराध्यक्षा योगिता शेळके यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. 

तेरा महिन्यांचा कालावधीत उपनगराध्यक्ष गोंदकर यांनी शहरातील पाणीपुरवठा तसेच स्वच्छता व नागरी समस्या सोडविण्यावर विशेष भर दिला होता. सर्वसामान्य जनतेच्या कामास त्यांनी प्राधान्य दिल्याने अल्पावधीतच ते लोकप्रिय बनले. साईसमाधी शताब्दी वर्ष सुरु असल्याने या पदास आता विशेष महत्त्व आले आहे. आता कोण उपनगराध्यक्ष होईल याकडे सर्वाचे लक्ष वेधले जाणार आहे.

दरम्यान, यापूर्वी वर्षभराचा कालावधी संपल्याने स्वीकृत नगरसेवक पदाचा ताराचंद कोते, हाजी बिलाल शेख यांनी राजीनामा दिला होता. स्वीकृत नगरसेवकासाठी इच्छुकांची चांगलीच भाऊगर्दी झाली असताना आता उपनगराध्यक्षपदाची शर्यत लागणार आहे. कोण यात बाजी मारते याकडे शिर्डीकरांचे लक्ष वेधले गेले आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.