राहुरी तालुक्‍यातील सोनगाव, सात्रळ, धानोरे येथे कडकडीत बंद.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :नववर्षाच्या प्रारंभी कोरेगाव भीमा येथील घटनेचे तीव्र पडसाद आज तालुक्‍यात उमटले. विविध संघटनांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येत आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. नगर-मनमाड रस्त्यावर तालुक्‍यात आज विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलने करण्यात आली. 

--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
तालुक्‍यातील बहुसंख्य गावात कडकडीत बंद पाळण्यात आला. अनेक ठिकाणी दुचाकी चारचाकी वाहने फोडण्यात आली. तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडील सोनगाव, सात्रळ, धानोरे या पंचक्रोशीत विविध संघटनांनी एकत्र येत बाजारपेठ बंद केली. तेथील आजचा आठवडे बाजारदेखील बंदच होता. सामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसला. या परिसरात असलेल्या पतसंस्था बॅंकांचे व्यवहारही दिवसभर ठप्प होते. यामुळे या परिसरातील जनजीवन ठप्प झाले होते. या ठिकाणी मुख्यबाजारपेठ रस्त्यावरील ये-जा करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या काचा संतप्त जमावाने फोडल्या. या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

दरम्यान. या घटनेची माहिती मिळताच लोणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे व राहुरी पोलिसांची कुमक येथे दाखल झाली. त्यांनी परिस्थितीचा आढावा घेत संतप्त जमावासमवेत चर्चा करत शांत राहण्याचे आवाहन केले. परिस्थितीवर नियंत्रण मिळवत वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर दंगल नियंत्रण पथक, राज्य राखीव दलाच्या तुकडीस पाचारण करण्यात आले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.