साई संस्थानने पादुका दौरा रद्द करण्यासाठी शिर्डी ग्रामस्थांचे उपोषण.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :साईबाबांच्या मुळ पादुका शिर्डीबाहेर नेऊ नये, साईसंस्थानने पादुका दौरा रद्द करावा तसेच मुळ पादुका भाविकांच्या दर्शनासाठी शिर्डीत मंदिर परिसरात खुल्या कराव्यात, या मागण्यांसाठी शिर्डी ग्रामस्थांनी लाक्षणिक उपोषण केले. साईभक्त, ग्रामस्थ तसेच विविध संघटनांनी या आंदेलनास पाठिंबा दर्शविला असून यात महिलाही सहभागी झाल्या आहेत.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
साईबाबांच्या कोणत्याही वस्तु शिर्डीबाहेर नेऊ नयेत, अशी मागणी शिर्डी ग्रामस्थांनी केली आहे. असे असताना साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापन मंडळाने बाबांच्या मुळ पादुका देशात विविध ठिकाणी दर्शनासाठी नेण्याचे नियोजन केले. ग्रामस्थांनी याबाबत वेळोवेळी निवेदन दिले तसेच याबाबत साईबाबांच्या समाधीवर चिठ्ठी टाकून बाबांचा कौल घेण्यात आला. या चिठ्ठीमध्ये पादुका बाहेर नेऊ नये असा कौल बाबांनी दिला. 

तसेच ग्रामस्थांच्या विरोध तीव्र विरोध असतानादेखील त्यास न जुमानता संस्थानच्या व्यवस्थापन मंडळाने पादुका दौरा सुरुच ठेवला आहे. शिर्डी ग्रामस्थांची दिशाभुल केली तसेच साईबाबांच्या मुळ पादुका बाहेर नेल्याचा आक्षेत घेत पादुका दौरा रद्द करावा व मुळ पादुका भक्तांच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात ठेवण्यात याव्या या मागणीसाठी पादुका दौरा विरोधी समितीचे तुकाराम गोंदकर, सर्जेराव कोते, प्रमोद गोंदकर, दत्तात्रय आसने, मिलींद कोते, मुरली गायके, अमोल गायके, नारायण थोरात, मंगेशराव वडनेरे, राम आहेर, विकी गोंदकर उपोषणास बसले आहे.

साईबाबांच्या पादुका शिर्डी बाहेर नेऊ नयेत, असे साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळास अनेकदा सांगितले. बाबांच्या मुळ पादुकांचे महत्व कमी होऊ नये, शिर्डी येणाऱ्या भाविकांना डोके टेकुन पादुका दर्शन द्यावे यासाठी पादुका दौरा रद्द करावा, अशी एकमुखी मागणी केली. 

छत्रपती शासन व ग्रामस्थांनी यापुर्वी सुरु केलेल्या उपोषणावेळी संस्थान अध्यक्षांनी पादुका दौरा संदर्भात शिर्डी ग्रामस्थांशी चर्चा केली जाईल व नंतर जो निर्णय सर्वानुमते होईल त्यानुसार पुढील दौरा नियोजन ठरेल, असे आश्वासन दिले होते. मात्र ग्रामस्थांशी कोणतीही चर्चा न करता नेमलेल्या समितीने परस्पर निर्णय घेतला. तो व्यवस्थापन मंडळाने स्वीकारुन पादुका दौरा चालु ठेवला. शिर्डी ग्रामस्थांचा विश्वासघात केला. संस्थानने पादुका दौरा रद्द करावा, या मागणीसाठी उपोषण सुरु केले असून साईभक्त व ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.