राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची स्वप्ने पाहणाऱ्या खेळाडूंच्या मदतीसाठी श्री.शांतीकुमार फिरोदिया फौंडेशन कटिबद्ध - नरेंद्र फिरोदिया

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :आज खेळाचे महत्व सातत्याने वाढत असून खेळाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. जिद्द, मेहनत व स्वतःच्या हिमतीवर खेळात प्राविण्य मिळविणारे खेळाडू आर्थिक कारणांमुळे वंचित राहू नये या हेतूने व भविष्यात ऑलंम्पिक पदकाची अपेक्षा ठेऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यशाची स्वप्ने पाहणाऱ्या खेळाडूंच्या मदतीसाठी श्री.शांतीकुमार फिरोदिया फौंडेशन कटिबद्ध असल्याचे मत नरेंद्र फिरोदिया यांनी व्यक्त केला.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
शांतीकुमारजी फिरोदिया फौंडेशन बुद्धीबळ, कुस्ती, धनुर्विद्या, सायकलिंग आदि विविध खेळातील उत्कृष्ठ खेळाडूंना आर्थिक सहकार्य करून प्रोत्साहन दिले. या सर्व खेळातील खेळाडूंनी मिळालेल्या संधीचे सोने करत अतिशय उत्कृष्ठ कामगिरी करत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश प्राप्त केले. अशा सर्व २०१७ मधील यशस्वी खेळाडूंचा फौंडेशनतर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी खेळाबाबत जागरुक राहून विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढा देणाऱ्या पालकांचाही सत्कार करण्यात आला.

फौंडेशनतर्फे येत्या ऑलम्पिक स्पर्धांच्या तयारी हेतूने खेळाडूंना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. लवकरच या नववर्षात ‘चेसकट्टा’ हा उपक्रम सुरु करण्यात येणार असून दररोज चेसप्रेमींना त्याचा वापर करून बुद्धिबळात प्राविण्य मिळविता येईल. अशाच प्रकारे विविध खेळांच्या सुविधा देऊन सर्वोत्तम खेळाडू घडविले जातील.

यावेळी बुद्धिबळ ग्रॅण्ड मास्टर शार्दुल गागरे, महिला इंटरनॅशनल मास्टर शामली गागरे राष्ट्रीय विजेता सुयोग वाघ, सय्यद मझहर, श्रेया आणेकर, सत्यम वरुडे, संकर्ष शेळके. राज्यस्तरीय विजेता- प्रणित कोठारी, प्रज्वल आव्हाड, मोहनीश सातभाई, उत्कर्ष पांढारकर, श्रेयस गाडगे, हर्ष गाडगे.कुस्ती स्पर्धा राष्ट्रीय सुवर्ण सोनाली मांडलिक, नामवंत बाल कुस्तीपटू - प्रविण गीऱ्हे , सायकलिंग- राष्ट्रीय सुवर्ण पदक प्राप्त संकल्प थोरात, बॉक्सिंग- राष्ट्रीय कांस्य विजेती आरती भोसले, क्रिकेट- प्रणव धनवडे (१७ वर्षांखालील) आर्चरी(धनुर्विद्या)- श्रद्धा गहिले, गोपाल कलगुंडे, गौरी चव्हाण, अथर्व बोठे, आदित्य गहिले, गोविंद कलगुंडे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी खेळाडू, प्रशिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास अ.नगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यशवंत बापट, सायकल प्रशिक्षक सुमेरसिंग,निर्मल थोरात, सुबोध ठोंबरे,श्री.पारुनाथ ढोकळ,श्री.शाम कांबळे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप जोशी यांनी केले तर आभार पल्लवी सैंदाणे यांनी मानले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.