नागरिकांनी सामाजिक सलोखा कायम ठेवावा-जिल्हाधिकारी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :पुणे जिल्­हयातील भिमा -कोरेगाव येथील घटनेच्या पार्श्वभूमिवर जिल्हयातील सर्व नागरिकांनी सामाजिक सलोखा राखून जिल्­ह्यातील वातावरण शांततापूर्ण ठेवावे. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
जिल्ह्यातील नागरिकांनी कुठल्­याही प्रकारच्­या अफवा, फेसबुक, व्हॉटसॲप यासारख्­या सामाजिक माध्­यमावरील अफवांवर विश्­वास ठेवू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्­यासाठी जिल्­हा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
यासंदर्भात, श्री. महाजन यांनी तात्काळ घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी जिल्­हयातील सर्व उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी आणि कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांना तालुकास्­तरावर पोलिस विभागाशी समन्­वय ठेऊन कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासंबधीचे निर्देश दिले आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.