राहुरी, श्रीरामपूर, राहात्यात बंद;राहाता, श्रीरामपुरात बसवर दगडफेक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :कोरेगाव भिमा येथे घडलेल्या हिंचाचार व जाळपोळीच्या घटनेचे पडसाद उत्तर नगरमध्ये उमटले. भिमसैनिकांनी ठिकठिकाणी मोर्च काढून निषेध नोंदविला. राहात्यामध्ये चार बसवर दगडफेक झाली. राहुरीत बाजारपेठेत बंद पाळण्यात आला. श्रीरामपुरात किरकोळ दगडफेकीचे प्रकार झाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले व नंतर सोडून दिले. नेवासेत लोकशाही विचार मंचने मोर्चा काढून या घटनेचा निषेध केला. कोपरगावात आज बुधवारी विविध दलित संघटनांनी कोपरगाव बंदची हाक दिली आहे. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
भिमा कोरेगाव येथील घटनेचे राहत्यात तीव्र पडसाद उमटले असून भिमसैनिकांनी सुमारे दोन अडीच तास नगर- मनमाड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान राहाता बस स्थानकावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या चार बसेसवर दगडफेक झाली. यामध्ये बसच्या काचा फुटून दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. या प्रकरणी राहाता पोलिसात अज्ञात १० ते १२ इसमांंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
राहुरीतील विविध दलित संघटनांनी एकत्र येऊन राहुरी येथील व्यापार बंद ठेऊन काही काळ नगर- मनमाड राज्यमार्ग बंद केला. यावेळी शहरातील वातावरण अचानक तंग झाले होते. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने बंद शांततेत पार पडला. शहरातील व्यवसाय दिवसभर बंद होते. श्रीरामपुरात सकाळी जमावाने रस्त्यांवर उतरून निषेध केला. त्यानंतर घोषणाबाजी करीत दुकाने बंद करण्यास भाग पाडले. यावेळी किरकोळ दगडफेकही झाली. काहीकाळ तनाव निर्माण झाल्याने पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेतले होते. 

नंतर त्यांना सोडून दिले. परिसरातील हरेगाव, दत्तनगर, उंदिरगाव आदी ठिकाणीही कडकडीत बंद पाळण्यात आला. भीमा कोरेगाव येथे शौर्यदिनाला लागलेल्या गालबोटाचे व हल्ल्याचे तीव्र पडसाद मंगळवारी कोपरगावात उमटले. या घटनेच्या निषेधार्थ आज बुधवार दि. ३ जानेवारी रोजी कोपरगाव बंदची हाक शहरातील सर्व दलित संघटनाकडून देण्यात आली आहे. 

नेवासा येथील लोकशाही विचार मंचच्या वतीने घटनेचा तीव्र निषेध करण्यात आला. शासनाने व पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने लक्ष घालून मनुवादी जातीयवाद्यांवर कठोर कार्यवाही करावी, अशी मागणी लोकशाही विचार मंचचे अध्यक्ष संजय सुखधान यांनी केली आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.