गादीवरचा महंत हा जनतेचा प्रतिनिधी : डॉ. नामदेव शास्त्री

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :गादीवरचा महंत म्हणजे जनतेचा प्रतिनिधी, तुम्ही देणगी स्वरुपात जे काही देताय, त्यातून गडाची प्रगती होते. गडाचे रक्षण करणे हे आपले पहिले काम असून, हीच भगवान बाबांची खरी सेवा आहे, असे प्रतिपादन भगवान गडाचे महंत डॉ. नामदेव महाराज शास्त्री यांनी केले. श्रीक्षेत्र भगवान गड येथ संत भगवान बाबा यांच्या ५३ व्या पुण्यतिथीनिमित्त झालेल्या कीर्तनात ते बोलत होते. 
----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
पुण्यतिथीनिमित्त सकाळी समाधी पूजन, बाबांच्या प्रतिमेची सवाद्य मिरवणूक काढून समाधीस्थळास प्रदक्षिणा, कीर्तन, महाप्रसाद असे कार्यक्रम पार पडले. या वेळी येळेश्वर संस्थानचे मठाधी हभप रामगिरी महाराज उपस्थित होते. या वेळी महंत शास्त्री म्हणाले की, आज भगवान बाबांचा समाधी उत्सव संपन्न होत असून, ५३ वर्षे पूर्ण झाले आहेत. भगवान गडाची वारी आणि निरंतर अन्नदान हा बाबांचाच आशीर्वाद आहे.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
मणुष्य जन्माला आल्यावर सेवा ही करावीच लागते. तरच आपले जीवन आनंदी राहते. ज्ञानेश्वरी ही मराठी, अडाणी माणसांची सेवाच आहे. सुसंस्कृत जीवन जगण्याचा मार्ग ज्ञानेश्वरीच शिकवते. भगवान बाबांचे नाव घेतल्यास मन शांत होते. तुम्ही काय करता हा तुमचा विषय आहे, त्याचे परिणाम तुम्हाला मिळतात, जसे पेराल तसेच उगवते, हा नैसर्गिक नियम आहे. 

संत तुमची विचारसरणी बदलतात, त्यामुळे आयुष्याचे कल्याण होते. संतांच्या विचारांचा अवलंब केल्यास जीवनात बदल घडतो. तुकोबाराय सांगतात, तरुणपण श्रीमंती आणि म्हातारपण दारिद्रय, त्यामुळे सत्कार्य करा. वै. खंडोजी बाबांनी कीर्तन केली नाहीत, पण भक्ती अपार होती म्हणून आज बाबांची मंदिरे उभारली जात आहेत. 

त्रास देणारे भगवंतच, भगवान बाबांना त्रास झाला म्हणूनच भगवान गडाची निर्मिती झाली. या वेळी महंतांचा सत्कार भारजवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब बटुळे, खरवंडी कासारचे ग्रामस्थ कानिफनाथ सोनवणेंसह ग्रामस्थांनी केला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.