भीमा-कोरेगाव घटनेचा श्रीगोंद्यात निषेध.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :भीमा -कोरेगाव येथे झालेल्या दंगलीच्या निषेधार्थ श्रीगोंदा तालुक्यातील बहुजन समाज़ाच्या वतीने तहसील कार्यालयावर घोषणा देत मोर्चा काढण्यात आला. दरम्यान, काही समाज़कंटकांकडून दोन एसटी बसेसचे नुकसान करण्यात आले असून, याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर झालेल्या सभेत बोलताना भाजपा आणि आरएसएस हेच आपले खरे शत्रू असल्याचे मत रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष बंडू जगताप यांनी व्यक्त केले. जगताप यांनी भाजपा सरकार आणि आरएसएसवर सडकून टीका केली. 

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
या वेळी त्यांनी भीमा- कोरेगाव यथे झालेल्या घटनेचा निषेध केला तसेच यापुढे आंदोलन अधिक तीव्र स्वरुपाचे करू. बहुजन समाजाचा लढा उभा करू. तीन टक्के समाज असलेल्या लोकांनी आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, अण्णा भाऊ साठे हे समजू दिले नाही, त्यमुळे आपली अशी गत झाली आहे. या तीन टक्के लोकांना धडा शिकविल्याशिवाय आपण शांत बसणार नाही. भाजपा आणि आरएसएस हेच खरे जातीयवादी व आपले शत्रू आहेत, अशी टीका त्यांनी केली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
निवेदनामध्ये हल्ला करणाऱ्या गुंडांना कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली आहे. चंदन घोडके यांनी आम्ही शूरवीर असून, यापुढे जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा दिला. या वेळी नंदू ससाणे, जीवा घोडके, जालिंदर घोडके, संगीता खामकर, टिळक भोस, गौतम घोडके, अरविंद कापसे तसेच भीमा -कोरेगावच्या दंगलीत जखमी झालेले कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी महिलांचा सहभाग मोठया प्रमाणात होता. .

दोन एसटी बसेसचे नुकसान.
श्रीगोंदा आगारात एमएच १४ बी टी ३५२८ ही जामखेड -पुणे गाडी आली असताना दोन मोटारसायकलवर आलेल्या अज्ञात लोकांनी गाडीवर दगडफेक करून एसटीचे नुकसान केले. या वेळीे एक प्रवासी जखमी झाला. याबबातची तक्रार रामभाऊ सुखदेव पुलवाले यांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनला दिली आहे. तसेच श्रीगोंदा- नगर गाडी एमएच १४ बी.टी. ८७४ ही गाडी बसस्थानक गेटसमोर आली असता, ६० ते ७० लोकांच्या जमावाने गाडीच्या दिशेने दगडफेक केल्याने एसटीचे नुकसान झाल्याची तक्रार गजानन रघुनाथ कोतकर यांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दिली असल्याची माहिती ठाणे अंमलदार साठे यांनी दिली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.