राहुरीच्या उपनगराध्यक्षपदी सुमती सातभाई.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :राहुरी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी सुमती भागवत सातभाई निवडून आल्या आहेत. उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होऊन तीत विखे-कर्डिले गटाचे भाजपचे नगरसेवक शहाजी जाधव यांचा त्यांनी ८ मतांनी पराभव केला.राहुरी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी यांनी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार १ वर्षाचा कालावधी पूर्ण होताच जिल्हाधिकाऱ्याकडे राजीनामा दिला होता. जिल्हाधिकारी यांनी रिक्त झालेल्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडीसाठी प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली नगरसेवकांची सभा बोलावली होती. 



----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
उपनगराध्यक्षपदासाठी सत्ताधारी गटाच्या वतीने प्रभाग ४ मधून विजयी झालेल्या सुमती भागवत सातभाई यांना उमेदवारी दिली, त्यांनी २ अर्ज दाखल केले. एका अर्जावर सूचक म्हणून अनिल यशवंत कासार तर अनुमोदक नंदकुमार ताराचंद तनपुरे, दुसऱ्या अर्जावर सूचक म्हणून संगिता अशोक आहेर तर अनुमोदक म्हणून सूर्यकांत दत्तात्रय भुजाडी यांच्या सह्या होत्या. 

विरोधी परिवर्तन गटाच्या वतीने भाजपचे शहाजी किसन जाधव यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून शिवाजी सोनवणे तर अनुमोदक म्हणून सोन्याबापू जगधने होते. पालिकेमध्ये सध्या सत्ताधारी जनसेवा मंडळाचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यासह १६ नगरसेवक असून विरोधी परिवर्तन आघाडीचे ६ नगरसेवक आहेत. कालच्या सभेस गटनेत्या डॉ. उषाताई तनपुरे व अक्षय रावसाहेब तनपुरे हे गैरहजर होते.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक अधिकारी तेजस चव्हाण यांनी हात वर करून मतदान घेतले असता श्रीमती सातभाई यांना १४ तर जाधव यांना ६ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. नूतन उपनगराध्यक्ष यांचा नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी सत्कार केला. मावळते उपनगराध्यक्ष प्रकाश भुजाडी यांचाही नगराध्यक्षांनी सत्कार केला.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.