कोट्यावधींच्या खर्चानंतर श्रीगोंद्यातील रस्ते पुन्हा 'जैसे थे' !

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्‍यातील रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी कोटींच्यावर खर्च करण्यात आला. मात्र, महिन्याच्या आतच रस्त्यांची अवस्था पुन्हा “जैसे थे’च झाली. संबंधित दोषींवर कारवाई करून रस्त्यांची दर्जेदाररीत्या दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा श्रीगोंदा तालुका कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत दरेकर यांनी दिला.

यासंदर्भात दरेकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपअभियंत्यांना निवेदन दिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, बांधकाम विभागाने महिन्यापूर्वी तालुक्‍यातील रस्त्यांवरचे खड्डे बुजविण्यास सुरुवात केली होती. ते काम पूर्ण झाले. त्याला कोटींवर खर्च करण्यात आला.

एकाच महिन्यात डांबरी पॅच निघून गेले. पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाली. काम करणाऱ्या एजन्सीची चौकशी करण्यात यावी. काष्टी, मांडवगण व वांगदरी भागातील रस्ते अपघाताला आमंत्रण देत आहेत. बांधकाम विभागाने दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास कॉंग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल..

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.