तीन महिन्यांत कांद्यातून घेतले तब्बल एक कोटी तीस लाख रुपयांचे उत्पन्न !

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पारनेर तालुक्यातील मुंगशी येथील शेतकरी सुनील नाना थोरात यांनी अवघ्या तीनच महिन्यात २५ एकरमध्ये लागवड केलेल्या कांद्याच्या पिकातून तब्बल एक कोटी तीस लाख रुपयांचे उत्पन्न घेतले.मुंगशी हे तालुक्यातील सुमारे एक हजार लोकसंख्या असणारे गाव. येथील शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------

या गावातील सुनील थोरात व त्यांचे दोन भाऊ असे एकत्रित कुटुंब आहे. त्यांच्याकडे सुमारे ५५ एकर शेती अाहे. गेल्या पंधरा वर्षांपासून ते कांदा पीक घेतात. यासाठी त्यांना त्यांचे भाऊ मच्छिंद्र थोरात व पोपट थोरात मदत करतात. या वर्षी पंचवीस एकरात कांदा लागवड केली होती. जुलैमध्ये रोप तयार करून त्याची लागवड ऑगस्टमध्ये केली. जवळपास अडीच महिन्यानंतर ऑक्टोबरमध्ये कांदा काढणीस सुरुवात झाली. सुरुवातीला पाचशे गोण्या कांदा विक्रीसाठी पुणे मार्केटला नेला.

त्याला ४२ रुपये भाव मिळाला. तेव्हापासून ते २५ जानेवारीपर्यंत सात हजार गोण्या कांदा विक्रीसाठी थोरात यांनी नेला. सरासरी तीस ते चाळीस पर्यंत भाव मिळाला. या कांदा विक्रीतून थोरात यांना एकूण उत्पन्न तब्बल एक कोटी तीस लाख रुपये इतके झाले. यासाठी खर्च दहा लाख रुपये आला खर्च वजा जाता एक कोटी वीस लाख रुपये निव्वळ नफा मिळाला. २५ एकर क्षेत्रातील उर्वरित ५ एकर कांदा काढणीला अजुन वेळ असल्याचे सुनील थोरात यांनी सांगितले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.