ट्रकला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार युवक जागीच ठार.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-औरंगाबाद हायवेवर शनिशिंगणापूर फाट्यानजीक रस्त्यावर उभ्या असलेल्या मालट्रकला पाठीमागून धडकल्याने दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला. युवकाने हेल्मेट घातले असूनही धडक इतकी जोराची होती की हेल्मेट फुटून त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
कचरू विलास बारगळ (35, रा. रस्तापुर, ता. नेवासे) असे युवकाचे नाव आहे. कचरू नगर एमआयडीसीमध्ये एका खासगी कंपनीत नोकरीला होता. त्याच्या पाश्चात वृद्ध आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, लहान मुले आहेत. कचरू नेहेमीप्रमाणे ड्युटीवरून घरी जाताना हा अपघात झाला.

हेल्मेट फुटून ट्रकच्या पाठीमागील बाजूला जोरात आदळल्याने कचरू मात्र जागीच ठार झला. त्याच्या नातेवाईकांना माहिती मिळतच तेही घटनास्थळी आले. कर्ता सवरता कचरूचा मृत्यू झाल्याचे पाहून त्यांनी हंबरडा फोडला.दरम्यान, मंगळवारी सकाळी नातेवाईक याप्रकरणी फिर्याद देत होते. ट्रक विनाक्रमांकाचा असल्याने त्याची मालकी, व चालक शोधण्याचा सोनई पोलिस प्रयत्न करत आहेत.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.