हॉटेलमधील मारामारी प्रकरणी सहा जणांना अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :३१ डिसेंबरच्या रात्री कोल्हारमध्ये हॉटेल ग्रीनलँडमध्ये राडा होऊन एकास भोकसून मारण्याचा प्रयत्न झाला. त्याबाबत परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्यानंतर तातडीने लोणी पोलिसांना ६ जणांना अटक केली. त्यांना काल राहाता न्यायालयासमोर हजर केले असता सहा आरोपींना सात दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली. या मारामारीतील दोन आरोपी अल्पवयीन असून एक अद्याप फरार आहे.

----------------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
--------------------------------
कांचन जाधव, धर्मा शिंदे, शुभम देठे, नवीन अण्णा पुजारी, तसेच हॉटेलचे कामगार गोविंदसिंग नंदनसिंग दानू, गिरेन्दरसिंग लच्हीन्दरसिंग अशा ६ जणांना अटक करून काल राहता न्यायालया समोर हजर केले. त्यांना ६ दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे. तुषार कैलास जाधव हा जखमी असल्याने त्यांच्यावर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच सोबत या घटनेतील गंभीर जखमी रतिकांत हरिगोपाल दलाई यास भोकसल्याने त्याच्यावर पाठीवर व पोटावर सुमारे आठ वार धारदार शास्त्राच्या साह्याने करण्यात आले होते. त्यास सुमारे ५० टाके पडले असून त्याचेवरही प्रवरा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

या घटनेची पार्श्वभूमी अशी, ३१ डिसेंबरच्या रात्री १० च्या सुमारास दारूच्या पैशावरून वाद झाले होते. मात्र ते मिटल्यानंतर पुन्हा ते विकोपाला जावून रात्री पावणेबाराच्या सुमारास वरील चौघे व इतर ४ ते ५ जणांनी हॉटेलवर दगडफेक केली होती. या मारामारीत दोन्ही बाजूकडील प्रत्येकी एक जखमी झाला होता. मात्र यातील धारदार शास्त्राने भोकसल्याने एक गंभीर जखमी झाल्याने जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा ३०७ अन्वये गुन्हा लोणी पोलिसात दाखल झाला होता. आम्हासही धारदार शास्त्राने व लाकडी दांडक्याने मारहाण झाल्याची फिर्याद कांचन जाधव याने दाखल केल्याने ३ कामगारांविरोधात ३२६ अन्वये जबर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता. या घटनेतील दोन आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना उद्या नगर येथे हलविण्यात येणार आहे. अजय पेटारे हा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा शोध पोलीस घेत आहेत. सदर घटनेचा तपास लोणीचे सपोनी रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भालचंद्र शिंदे करीत आहेत.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
केवळ २० रुपयांसाठी ९ जणांना घडणार जेलची वारी...!.
हॉटेल ग्रीनलॅड येथे सदर राडा दारूच्या बिलावरून झाल्याचे समजते. दारू आणि पाण्याची बाटली असा हिशोब होता. मात्र पाण्याची बाटली दिली नाही असे आरोपींचे म्हणणे होते तर पाण्याची बाटली दिली असे कामगार सांगत होते. या कारणावरून हा वाद विकोपाला गेला अन् आता या घटनेत एकूण ९ आरोपी जेलची हवा खाणार आहेत ती केवळ २० रुपयांच्या पाण्याच्या बाटलीकरीता..!.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.