हे तर नरबळी घेणारे सरकार - राधाकृष्ण विखे पाटील.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : भाजप-शिवसेना सरकारच्या काळात आत्महत्या केल्याशिवाय न्याय मिळत नाही. हे सरकार न्यायासाठी नरबळी मागणारे सरकार असल्याची घणाघाती टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
काँग्रेस पक्षाच्या औरंगाबाद जिल्हास्तरीय शिबिरात बोलताना त्यांनी सरकारच्या धोरणांवर हल्लाबोल केला. राज्यातील एकही घटक आज समाधानी नाही. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी अशा सर्वच घटकांमध्ये कमालीचा असंतोष दिसून येतो आहे. सर्वसामान्यांना न्याय द्यायला हे सरकार तयार नाही. धर्मा पाटील यांनी विष प्राशन केल्यानंतरच सरकार खडबडून जागे झाले. शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापारीही आत्महत्या करीत असून, मुंबईतील मनिष मेहता नामक व्यापाऱ्याने मंदीला कंटाळून आत्महत्या केली, असे सांगून हे सरकार नरबळी घेणारे सरकार असल्याचा ठपका विखे पाटील यांनी ठेवला.

देशातील आणि राज्यातील सध्याची परिस्थिती गंभीर असून, काँग्रेस कार्यकर्त्यांनी गावोगावी भाजप-शिवसेना सरकारच्या निष्क्रियतेचा पंचनामा करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रदेश काँग्रेसने सुरू केलेला जिल्हास्तरीय शिबिरांचा उपक्रम स्तुत्य असून, कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका मांडण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होईल, असे विखे पाटील पुढे म्हणाले.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
खा. राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर नवी दिल्लीत केलेल्या भाषणात देशासमोरील अनेक आव्हानांचा उल्लेख केला होता. त्यांच्या त्या भाषणाने काँग्रेस पक्षाला पुढील लढाईसाठी दिशा मिळाली असून, खा. राहुल गांधींनी नेतृत्व स्वीकारल्याने कार्यकर्त्यांमध्ये विशेषतः तरूणाईत उत्साह संचारल्याचे दिसून येते, असेही विखे पाटील म्हणाले.गेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडून आलेले बहुतांश उमेदवार 30 वर्षे वयोगटातील होते. त्यामुळे पुढील काळात तरूणांना अधिक संधी देण्याची आवश्यकताही त्यांनी विषद केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.