श्रीरामपुरात आदिवासी बांधव रस्त्यावर.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : जातीचा दाखला महसूल खात्याकडून मिळाला नाही म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. त्याच्या निषेधार्थ आज संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी एकलव्य संघटनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. पंधरा दिवसांच्या आत दाखले मिळाले नाही, तर प्रांताधिकाऱ्यांना दालनातच कोंडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
भिल्ल समाजाला जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया सरकारने यापूर्वी सुलभ केली असली तरी आता काही अधिकाऱ्यांनी मात्र वेगवेगळी परिपत्रके काढून दाखले देण्यास विलंब चालविला आहे. सेतू कार्यालयात दाखल्यांसाठी कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर मुदतीत दाखले दिले जात नाहीत. पन्नास वर्षाचे पुरावे मागितले जातात. आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांचे दाखले अडविण्यात आले.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शहरातील आदिवासी वसतिगृहातील १२ विद्यार्थ्यांचे व चार विद्यार्थिनींचे जातीचे दाखले न मिळाल्याने त्याना वसतिगृहातील प्रवेश रद्द करण्यात आले. तसेच विविध महाविद्यालयात शिकणाऱ्या १७ विद्यार्थ्यांना आदिवासींसाठी असलेली शिष्यवृत्ती मिळाली नाही. अशाप्रकारे शेकडो विद्यार्थी अडचणीत आले आहेत. त्यामुळे आज मोर्चा नेऊन निषेध करण्यात आला.

प्रांताधिकारी तेजस चव्हाण यांना एकलव्य संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी पवन सोनवणे, रतन सोनवणे, अनिल जाधव, देवीदास माळी, राजेंद्र भालेराव, अनिल मोरे, दीपक ठाकरे, अनिल रोकडे, उत्तम पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते. प्रांताधिकारी चव्हाण यांनी पन्नास वर्षांपूर्वीचे पुरावे जातीच्या दाखल्यासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. मात्र, ढवळे यांनी त्याला विरोध केला. 

सरकारने आदिवासींना दाखले देण्याकरिता परिपत्रक काढून सुधारणा केली आहे. ग्रामसेवक, मुख्याध्यापक, सरपंच, पोलीस पाटील, तलाठी व पंचांनी पंचनामा केल्यानंतर तसेच कुटुंबातील पूर्वीचा दाखला असेल तर अन्य पुरावे न बघता दाखले देण्याची तरतूद परिपत्रकात करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी झाली नाही तर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. प्रांताधिकारी चव्हाण यांनी आदिवासींचे मेळावे घेऊन त्वरित जातीचे दाखले दिले जातील. त्याची अडवणूक केली जाणार नाही, असे आश्वासन दिले.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.