राजकारणाचा उपयोग समाज विकासासाठी व्हावा- आ. थोरात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम : बुद्धीमत्ता व शक्ती असलेल्या मुलांना संधी मिळवून दिली तर त्यांचा विकास झाल्याशिवाय राहत नाही. योग्यवेळी राजकारण केलेच पाहिजे. परंतु, राजकारणाचा उपयोग समाजाच्या विकासासाठी व्हावा, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील शुक्लेश्वर विद्यालयाच्या विस्तारित बांधकाम नूतन इमारतीच्या उद्घाटन व विविध गुणप्रदर्शन पारितोषिक वितरण समारंभ ते बोलत होते. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
आ. थोरात म्हणाले, अलिकडच्या काळात लोकवर्गणी काढून एखाद्या संस्थेचा विकास साधणे सोपे काम नाही. ते येथील कार्यकर्त्यांनी व देणगीदारांनी दाखवून दिले आहे. शिक्षणाशिवाय प्रगती नाही, नुसती समृद्धी येऊन चालत नाही. आपण २७ वर्षांच्या काळात मुला - मुलींच्या शिक्षणाची सोय केली असून विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे गरीब कुटुंबातले होते. ते अतिशय कष्टाने वैज्ञानिक झाले. 

त्यानंतर देशाचे राष्ट्रपतीही झाले. अब्दुल कलामांसारखे संशोधक व राष्ट्रपती व्हा. संगमनेर तालुक्यातील कोठे बु।। येथील निता भालके व सुकेवाडी येथील अभिजीत सातपुते यांनी संगमनेरचे नाव मोठे केले आहे, असेही ते म्हणाले. यावेळी अभिजीत सातपुते या विद्याथ्र्याचे इंडियन इ्स्टिटट्यूट ॲण्ड सायन्स एज्युकेशन रिसर्चमध्ये ॲरोनॅटिक इंजिनिअर प्रशिक्षणासाठी निवड झाल्यामुळे त्याचा सत्कार करण्यात आला.

यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, जि.प.सदस्य भाऊसाहेब कुटे यांची भाषणे झाली. प्रास्तविक शुक्लेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंतराव थोरात यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयाच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून सत्कार करण्यात आला.

यावेळी सुनील कुटे, सुनील सातपुते, चंदु सातपुते, सुनील पेंटर, अमोल सातपुते, संदिप कुटे, नवनाथ वामन, अनिल कुटे, रवींद्र सातपुते, सोन्याबापू सातपुते, निवृत्ती सातपुते, प्रविण सातपुते यांनी संस्थेला विविध प्रकारचे योगदान दिल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण शेटे, डॉ.दत्तात्रय राऊत, बाळासाहेब सातपुते आदींसह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.