गावाबाहेर राहूनही वडनेरकर तरुण जपताहेत सामाजिक बांधिलकी.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- 'सुशिक्षित तरुण एकत्र येऊन निःस्वार्थी भावनेने सामाजिक बांधीलकी म्हणून काम करतात तेव्हा सकारात्मक बदल घडल्याशिवाय राहत नाही याचं उत्तम उदाहरण म्हणजे ग्रामसमृद्धी फाऊंडेशन वडनेर बु॥ होय' असे प्रतिपादन जेष्ठ व्याख्याते प्रा. श्री. शिवाजीराव मेटकुळे यांनी केले,ते ग्रामसमृद्धी फाऊंडेशन वडनेर बु॥ आयोजित विद्यार्थी पालक मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते. ते पुढे म्हणाले की असे आदर्शवत काम जर प्रत्येक गावात घडले तर समाज बदलायला जास्त कालावधी लागणार नाही. 


----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
गावाबाहेर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या वडनेरकर तरुणांच्या ग्रामसमृद्धी फाऊंडेशन ने केलेल्या पहिल्या टप्प्यातील विविध कामांचे अनावरण आणि वितरण यावेळी करण्यात आले. यामध्ये गावातील तीनही प्राथमिक शाळांना पाणी शुद्धीकरण यंत्रे (फिल्टर), माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाला प्रयोगशाळेचे अद्ययावत साहित्य आणि नव्याने बनवण्यात आलेल्या कुस्तीच्या मैदानाचं लोकार्पण या गोष्टींचा समावेश होता.

फाऊंडेशनच्या कामाविषयी अधिक माहिती देताना संस्थापक विकास बबन वाजे यांनी सांगितले की शिक्षण, पाणी व आरोग्य या अशा पायाभूत गोष्टींवर विशेष भर देण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. भविष्यातही असेच उपक्रम या फाऊंडेशन च्या माध्यमातून राबवण्याचा आमचा मानस आहे असंही ते म्हणाले.कार्यक्रमाच्या सुरुवातीला वडनेर बु॥ येथे लहानपण घालवलेले प्रसिद्ध कवी देवा झिंजाड यांनी 'माझी आई' ही कविता सादर केली व उपस्थितांना अश्रु अनावर झाले.

यावेळी स्मार्ट ग्राम वडनेर बु॥ च्या सरपंच सौ. स्वाती अनिल नऱ्हे या अध्यक्षस्थानी होत्या. तसेच इतर लोकप्रतिनिधी, विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महेश बोचरे यांनी केले तर विक्रम वाजे यांनी आभार मानले.ग्रामसमृध्दी फाऊंडेशनच्या उपक्रमाचे वडनेर बु॥ आणि परिसरात कौतुक होत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.