अकोले-संगमनेर रस्त्यावर बसला अपघात.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- अकोले ते सातेवाडी या अकोले आगाराच्या बसला शुक्रवाारी सकाळी दहाच्या दरम्यान अकोले-संगमनेर रस्त्यावर रोकडोबा मंदिराजवळ गाजराच्या वाहाळात अपघात झाला. यामध्ये प्रवासी किरकोळ जखमी झाले आहे.

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
सकाळी अकोले-सातेवाडी ही बस अकोले बसस्थानकातून १० वाजता सुटते. यामध्ये १० प्रवासी होते. बस अकोले ते संगमनेर रस्त्यावर असताना चालकाला अंदाज न आल्याने बस गाजराच्या वहाळात गेली. यामध्ये सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने रूग्णवाहिकेने अकोले ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

आ. वैभव पिचड यांनीही तातडीने घटनास्थळाला भेट देवून अपघाताची पाहणी केली. तसेच रूग्णांचीही विचारपूस केली. यानंतर अकोले आगारप्रमुख ए. व्ही. आव्हाड यांनीही घटनास्थळाला भेट देवून पाहणी केली. अपघात चालकाचा अंदाज चुकल्याने झाल्याचेही श्री. आव्हाड यांनी सांगितले. अपघात झाल्यावर अपघातस्थळी जखमी प्रवाशांच्या मदतीला धावले. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.