आ. कर्डिले - खा.नाना पटोले यांच्यामध्ये बंद खोलीत 'गुप्तगू'

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर सत्ताधारी भाजपामध्ये बंडखोरी करीत खा. नाना पटोले यांनी शिर्डी येथे जाऊन साईदर्शन घेतले. शिर्डी येथून परतताना पटोले यांनी राहुरी येथे सायंकाळी 5 वाजता आ. शिवाजी कर्डिले यांच्या कार्यालयात भेट घेतली. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
यावेळी पटोले यांचा आ. कर्डिले यांनी मोठ्या सन्मानाने स्वागत करून त्यांचा सत्कार केला. भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसमध्ये दाखल झालेले खा. नाना पटोले व भाजपाचे विद्यमान आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्ये राहुरी येथील आमदार कर्डीलेंच्या कार्यालयात बंद खोलीत चर्चा झाल्याने राजकीय विश्‍लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

भाजपातून बंडखोरी केल्यानंतर पक्षात नाराज असलेल्या नेत्यांच्या भेटी घेण्याचा नाना पटोले यांचा धडाका सुरू आहे. कालच्या शिर्डी दौर्‍यात त्यांच्यासोबत भाजपाचे दोन आमदार असल्याचीही चर्चा होती. त्यातच काही दिवसांपासून ना. राधाकृष्ण विखे व आ. कर्डिले यांच्यातील वाढती जवळीक पाहता कालची नाना पटोलींची भेट यामुळे दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा झडत आहेत. 

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.