शिर्डीत बनावट दर्शनपास विकणाऱ्या दोघांना अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सलग सुट्यामुळे शिर्डीत झालेल्या गर्दीचा फायदा उठवत साईभक्तांना बनावट दर्शनपास विक्री करुन गोरखधंदा करणाऱ्या दोघांना शिर्डी पोलीस व साईबाबा संस्थान सुरक्षा विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचून रंगेहात पकडले आहे. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
विजय गणेश वाडेकर (वय ३५), रवींद्र सुकदेव रणदिवे (वय २४, दोघे रा. लक्ष्मीनगर, शिर्डी) अशी या दोघांची नावे आहेत. दोघांना न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. याबाबत पोलीस सुत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी : सलग सुट्यामुळे शिर्डीत झालेल्या गर्दी फायदा उठवत साईदर्शनाचे सशुल्क बनावट पास विक्री होत असल्याची माहिती गुप्त खबऱ्या मार्फत शिर्डी पोलीस व साईमंदिर सुरक्षा विभागास मिळाली.

त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय अधिकारी डॉ. सागर पाटील, साईमंदिराचे उपविभागीय अधिकारी आनंद भोईटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप इंगळे, पो.ना. लोंढे, हवालदार आढाव, मुख्य हवालदार मकासरे, हवालदार थोरात, सातपुते, स्थानिक गुन्हे अन्वेषण अहमदनगर पथकातील मुख्य हवालदार सुनील चव्हाण, दिनेश मोरे, संदिप घोडके, साईमंदिर सुरक्षेचे नवनाथ बनकर, रामदास धिवर, प्रकाश कर्पे, सुनील गोतीस, विजय गायकवाड यांनी साईबाबा मंदिर परिसरात सापळा लावला. 

यावेळी बनावट पास विकणाऱ्या संशयित व्यक्तीकडे बनावट भक्तास पास घेण्यासाठी पाठवले. आरोपी विजय वाडेकर व रवींद्र रणदिवे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडील बनावट पासेस हस्तगत करण्यात आले आहे. त्यांच्या विरोधात शिर्डी पोलिसांत गु.र.नं. २१/२०१८ नुसार भादंवि कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१, ५११, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

त्यांना राहाता न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यापूर्वी शिर्डी पोलीसांनी बनावट पासविक्री करणाऱ्यांचा पदार्फाश करुन त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. पासविक्रीचा गोरखधंदा करणाऱ्या टोळीचा आता या दोघांकडून उलगडा होण्याची शक्यता आहे. याकामी पुढील तपास सहा. निरीक्षक प्रविण पाटील करत आहे.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.