राहुल धनवटे खुन प्रकरणातील तीन फरारी आरोपींना अटक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासा फाटा येथील खुनाच्या गुन्ह्यातील तीन फरारी आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली आहेत.नेवासा फाटा येथील हॉटेल मारवाडसमोर दि. १ जुलै २०१७ रोजी दोन गटात मारामाऱ्या झाल्या होत्या. त्यात रवी भालेराव व त्याच्या साथीदारांनी राहुल धनवटे व त्याचे मित्र ज्ञानेश्वर दहातोंडे, मयूर वाघ, विशाल आळकुटे यांना मारहाण करून जखमी केले होते. त्यातील राहुल धनवटे याचा उपचारादरम्यान मृत्यू झालेला होता. 

----------------------------
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS .
-------------------------------
घटनेनंतर या प्रकरणात चार आरोपींना अटक झालेली होती; मात्र त्यांचे साथीदार फरार झाले होते. त्यांचा शोध पोलीस कसोशीने घेत होते. अशातच दि. २६ जानेवारी रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने औरंगाबाद येथील वाळुंज परिसरातील जॉन्सन ॲण्ड जॉन्सन कंपनीजवळून रवि शिवाजी शेरे यास ताब्यात घेतले. 

त्याच्याकडून मिळालेल्या माहितीवरून निखील किशनलाल चंदानी यास यशश्री प्रेसकॅपजजवळून ताब्यात घेतले. आणखी एक आरोपी शंकर ऊर्फ दत्तु अशोक काळे यास महाराणा प्रताप चौकातील हॉटेलजवळुन ताब्यात घेतले. तिन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना ३१ जानेवारीपयंर्त पोलीस कोठडी देण्यात आली.
--------------------------------
ADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG!NNNN
----------------------------------
ही कारवाई पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक रोहिदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजित शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल विठ्ठल गायकवाड, बाबासाहेब लबडे, जयवंत तोडमल, महेश कचे, नानासाहेब तुपे, संदिप दरंदले, बाळासाहेब नागरगोजे, रघु कारखीले यांनी केली.

-------------------------------------------------
अहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा, 
अहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा 
Ahmednagarlive24 चे App  https://goo.gl/A1KePS ह्या लिंकवरून . 
ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.